Potholes cause spine disorders in Nashik 
नाशिक

Potholes cause spine disorders in Nashik|खड्ड्यांनी मोडले नाशिककरांचे मणके

Road digging and potholes cause spine disorders in Nashik | 'नामको'त ३५० हून अधिक शस्त्रक्रिया : एंडोस्कोपिक शस्त्रक्रियांद्वारे रुग्णांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरभर केलेल्या खोदकामामुळे रस्ता शोधणे अवघड होत असल्याने नाशिककरांची 'वाट' बिकट झाली आहे. खड्यांमधून रस्ता शोधत प्रवास करणाऱ्या कित्येक नाशिककरांचे मणके मोडले असून, शहरातील रुग्णालयांमध्ये मणके विकाराचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. मागील काही दिवसांमध्ये एकट्या नामको हॉस्पिटलमध्ये ३५० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, रुग्णांची संख्या वाढतच आहे. अर्थात खड्यांबरोबरच आधुनिक जीवनशैली, मोबाइल आणि संगणकाचा वाढता वापर, चुकीच्या बैठक पद्धतीदेखील मणके विकारास कारणीभूत ठरत असल्याचे एंडोस्कोपिक न्यूरोसर्जन डॉ. चंद्रतेज कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जागतिक स्पाइन दिनानिमित्त डॉ. कदम यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी नामको ट्रस्टचे सचिव शशिकांत पारख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाखा जहागीरदार, महाव्यवस्थापक समीर तुळजापूरकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत पाठक उपस्थित होते. डॉ. कदम म्हणाले, "खड्ड्यांमुळे मणके विकाराचे प्रमाण चिंताजनक आहे. तसेच संगणकावर काम करणे, सतत मोबाइलचा वापर करणे आणि बराच वेळ एकाच स्थितीत बसून राहणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, या काळात शरीराची ठेवण योग्य नसेल, तर मानेसह पाठीच्या मणक्यांवर अतिरिक्त ताण येतो. त्यातून सर्व्हयकल स्पॉन्डिलायसिस, स्पॉन्डिलायसिस आणि सायटिका यांसारख्या विकारांचा त्रास उद्भवू शकतो."

सामान्यतः कर्करोग, हृदयरोग, मधुमेह आणि मूत्रपिंडाच्य आजारांविषयी नागरिक अधिक जागरूक असतात. मात्र, मणक्यांच्य विकारांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या वेदन वाढल्यानंतर दैनंदिन कामकाजाव-परिणाम होतो. त्यामुळे पाठदुखी मानदुखी किंवा हात-पायांत मुंग्या येणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करत वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉ. कदम म्हणाले.

योग, प्राणायामावर द्यावा भर

येत्या पाच ते दहा वर्षांत मणक्यांची गादी सरकणे, मणक्यांमधील अंतराशी संबंधित विकार, स्पॉन्डिलायटिस आणि स्पॉन्डिलायसिसच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता डॉ. कदम यांनी व्यक्त केली. हे टाळण्यासाठी आजपासूनच जीवनशैलीत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी बसण्याची योग्य पद्धत, नियमित हालचाल, आवश्यक विश्रांती, योगासने आणि प्राणायाम यांचा दिनक्रमात समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT