नाशिक : उबाठा गटाच्या उपनेत्या व माजी आमदार निर्मला गावित यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. मुंबई येथे शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, शिवसेना सचिव राम रेपाळे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार पांडुरंग गांगड, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, उपजिल्हाप्रमुख संपत काळे, तालुकाप्रमुख रवी भोये, रघुनाथ तोकडे, सुरेश गंगापुत्र, सनी मेढे आदी मान्यवर उपस्थित होते.
नाशिक / ठाणेइगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील शेकडो महिला कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लाडकी बहीण, लाडका भाऊ व शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या योजनांचा ठामपणे पाठिंबा दर्शवला. महायुती सरकारने दिलेली विधानसभा निवडणुकीतील आश्वासने टप्प्याटप्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे सूत्र अंगीकारून काम करण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. शालेय पोषण आहार योजनेत कार्यरत महिलांच्या मानधनवाढीबाबत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रमेश वेलजी गावित, नयना गावित, कचरू दादा डुकरे, सोमनाथ जोशी, संदीप जाधव, मोतीराम दिवे, गणपत दादा वाघ, मथुराताई जाधव, साहेबराव धोंगडे, शरद कुटके, गुलाबराव वाजे, रमेश शिंदे, गणेश जाधव, दत्ता जाधव, विलास मालुंजकर, अंबादास माडी, मधुकर झोले, नाना वारे, पांडुरंग आचारी, रमेश शेंडे, रमेश भोये, दिलीप घोरपडे, तुकाराम चौधरी.