देवळाली कॅम्प (नाशिक) : भगूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच एमइएस बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक बलकवडे यांनी अनेक शिवसेना कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला.
भगूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच एमइएस बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक बलकवडे यांनी भाजपात पक्ष प्रवेश केल्याने भगूरमध्ये शिवसेना उबाठा गटाला खिंडार पडले आहे. मुंबईत पक्षप्रवेशावळी बलकवडे यांच्यासमवेत युवा सेना शहराध्यक्ष सिद्धेश गायकवाड व अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव, जिल्हा सरचिटणीस शरद कासार, प्रसाद आडके, पर्यावरण आघाडी अध्यक्ष तानाजी भोर, किसान मोर्चा अध्यक्ष सुनील गायधनी, औद्योगिक आघाडीचे पंकज शेलार, प्रकाश कर्डिले आदींसह भगूरमधील पदाधिकारी उपस्थित होते.