Major Setback to UBT Group in Nashik | नाशिकमध्ये 'उबाठा'ला खिंडार!

बडगुजर, घोलप, मुर्तडक अखेर भाजपमध्ये
Major Setback to UBT Group in Nashik  |  नाशिकमध्ये 'उबाठा'ला खिंडार!
Published on
Updated on

for the past few days, Uddav Thackeray's Shiv Sena (Shiv Sena UBT) has been facing continuous setbacks in Nashik

नाशिक : नाशिकमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सीमा हिरे यांचा विरोध डावलून 'उबाठा'चे माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नयना घोलप आदींनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १७) भाजपमध्ये प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपचे बळ वाढणार असून, आगामी निवडणुकांमधील भाजपचा मोठा विजय दृष्टिपथात आल्याचा दावा, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बडगुजर ठाकरे गटात अस्वस्थ होते. आपल्यासह पक्षातील १० ते १२ जण नाराज असल्याची उघड प्रतिक्रिया दिल्याने पक्षाने त्यांच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई केली. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. बडगुजर यांच्या प्रवेशाला आ. हिरे यांचा विरोध आहे. यासाठी हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली होती. परंतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाजन यांच्या पुढाकाराने बडगुजर यांचा भाजप प्रवेश सुकर झाला. मंगळवारी भाजप मुंबई प्रदेश कार्यालयात बडगुजर यांच्यासह शिवसेनेत तब्बल सात वेळा आमदार राहिलेले तसेच भाजप-शिवसेना युतीच्या सत्ताकाळात समाजकल्याणमंत्री पद भूषविलेले बबन घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक, नयना घोलप, माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, माजी नगरसेवक अशोक सातभाई, दिलीप दातीर, नंदिनी जाधव, दीपक बलकवडे, पवन मटाले आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश, महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प झाला आहे. बडगुजर, घोलप यांच्या प्रवेशामुळे भाजप अधिक मजबूत होऊन आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा मोठा विजय दृष्टिपथात आला आहे. बडगुजर यांचा प्रवेश सोहळा आज होणार हे माहिती नव्हते. महाजन यांच्या पुढाकाराने आज हा सोहळा आयोजित करण्यात आल्याचे स्पष्टीकरणही बावनकुळे यांनी दिले. कार्याध्यक्ष चव्हाण यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. एक परिवार म्हणून काम करू, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

Major Setback to UBT Group in Nashik  |  नाशिकमध्ये 'उबाठा'ला खिंडार!
Nashik Shivsena UBT Setback | शिंदेसेनेचाही 'उबाठा'ला दणका

मतभेद दूर करू : बावनकुळे

मनभेद नाहीत, मतभेद आहेत ते दूर होईल याचा विश्वास आहे. कोणी एखाद्या पक्षात असतो तेव्हा तो वाढवण्यासाठी पुढे जात असतो, कधी शिंतोडे उडवतो. मात्र, आता जबाबदारी आहे की जुन्या नव्यांना घेऊन पुढे जायचं आहे. बडगुजर यांच्यावर आरोप केले जातात. परंतु जोपर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले. सकाळी ९ वाजता भोंगा वाजविणारेही जेलमध्ये जाऊन आले. त्यांना भाजप प्रवेशावर बोलण्याचा अधिकार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Nashik Latest News

'अब की बार १०० पार'

बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या स्वकीयांना मंत्री महाजन यांनी प्रवेश सोहळ्यातही सुनावले. सर्व 'अड‌थळे' पार करून अखेर बडगुजर यांचा प्रवेश झाल्याचे नमूद करताना काही लोक मला दलाल म्हणतात. होय मी पक्षाची दलाली करतो. पक्ष मोठा होण्यासाठी जे करायचे ते करत राहीन, असे महाजन यांनी ठणकावून सांगितले. गत मनपा महापालिकेत १२२ पैकी भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आले होते. 'अब की बार १०० पार'चा नारा महाजन यांनी दिला. धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या चारही महापालिका एकहाती ताब्यात घ्यायच्या आहेत, असे सांगताना सर्वात मोठा आकडा नाशिकमधून देऊ, अशी ग्वाहीही महाजन यांनी यावेळी दिली.

आज भाजपात आदराने प्रवेश झाला, त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत. आपत्ती आली की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला. आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली हे माहिती नाही, मात्र मी निष्पाप आहे. महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल. निष्ठेने काम करू आणि परिकाष्ठा करू.

सुधाकर बडगुजर, माजी उपनेते, उबाठा

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मला कुठलंही पद नव्हतं. मला पक्षाने रिटायर करून टाकले. मला लोकांची कामे करायची त्यासाठी सत्ता पाहिजे. म्हणून मी भाजपात प्रवेश केला आहे. बडगुजर यांच्यासारख्या निष्ठावान पदाधिकाऱ्यावर हकालपट्टीची कारवाई झाली. हे अन्यायकारक आहे. त्यामुळेच मी त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेशासाठी आलो आहे.

बबन घोलप, माजी मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news