नाशिक : वर्षभर चाललेल्या कठोर शिस्तीच्या प्रशिक्षणाची, शारीरिक, मानसिक कसोटीची आणि कायदा-व्यवस्थेच्या सखोल अभ्यासाची सांगता बुधवारी (दि. 24) त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीत होणार आहे.
पोलिस उपनिरीक्षकांच्या 126 व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा सकाळी पार पडणार आहे. कार्यक्रमाला पोलिस महासंचालक नवलकुमार बजाज यांची प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहे.या तुकडीतून 390 हून अधिक प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र पोलिस दलात दाखल होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत थेट निवड झालेल्या या उपनिरीक्षकांचे प्रशिक्षण 23 डिसेंबर 2024 पासून सुरू झाले होते. महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रियांका शांताराम पाटील (प्रथम), दीपक बालाजी घोगरे (द्वितीय), ऋषिकेश मोहन कोरे (तृतीय), सुप्रिया बाळकृष्ण भिसे (चतूर्थ) आणि दिनेश जाधव पाचव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहेत.