Nashik Police Accident News : 'आई तू मामाला ओवाळायला जा...' कर्तव्यावर रुजू होणाऱ्या पोलीसाचा संवाद ठरला अखेरचा

रासेगावजवळ ट्रकच्या धडकेत पोलिस जागीच ठार
दिंडोरी (नाशिक)
दिंडोरी: नाशिक- पेठ रस्त्यावर झालेल्या अपघातात चक्काचूर झालेली स्विफ्ट कार. (छाया: अशोक निकम)
Published on
Updated on

दिंडोरी (नाशिक) : नाशिक पेठ रस्त्यावर रासेगावजवळ आयशर आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या अपघातात पोलिस कर्मचारी जागीच ठार झाला.

तालुक्यातील जांबुटके येथील रहिवासी रणजित मुरलीधर अपसुंदे (वय ३८) हे गंगापूर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. नोकरीनिमित्त ते नाशिकला रहात होते. दिवाळी सणासाठी ते आपल्या मुळ गावी आले होते. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी आपल्या स्विफ्ट कारने नाशिककडे निघाले होते. नाशिककडुन पेठकडे जाणाऱ्या आयशर ट्रकची (जीजे15 एटी5031) रासेगावजवळ त्यांच्या कारला धडक बसली आणि रणजित अपसुंदे यांचा कारमध्येच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पोलिसांनी या अपघातप्रकरणी ट्रकचालक राधेश्याम बच्चा (रा. उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे.

दिंडोरी (नाशिक)
Nashik Murder| जुन्या भांडणाच्या रागातून चौसाळे येथे युवकाचा खून

आई तु जा...हे शेवटचे वाक्य

दिवाळीसाठी घरातील सुना माहेरी गेल्याने आई वडील आणि तिघे भाऊच घरी होते. गुरुवारी (दि.23) भाऊबीज असल्याने रणजितने दिंडोरी येथील आपले मामा त्र्यंबकराव मुरकुटे यांना ओवाळण्यासाठी आईला पाठविले. घरी आवरायला कुणी नाही मी नंतर जाईल, असे आईने सांगितले. मात्र आई तु जा, मी आहे ना आवरायला...हे रणजितचे आईबरोबरील संवादात शेवटचे वाक्य ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news