देवळा (नाशिक) : येथील शलाका शिरसाठ पवार यांची पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. बुधवार (दि. २४ ) रोजी महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे प्रमुख अतिथी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या उपस्थितीत झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांनी शिस्तबद्ध संचलन करत संविधान आणि कर्तव्याची शपथ घेतली.
शलाका या देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक सुनीता व आर. एन. शिरसाठ तसेच माध्यमिक शिक्षिका वनिता यांच्या कन्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१ मधील संयुक्त गट-ब सेवा परीक्षेतून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत हे चारही टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करून एप्रिल २०२४ मध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती.
३९० प्रशिक्षणार्थींमध्ये मिळवला ९६ वा क्रमांक
नोव्हेंबर २०२५ मध्ये सटाणा महाविद्यालयातील प्रा. स्वामी पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर दि. २३ डिसेंबर २०२४ पासून त्यांनी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत सत्र क्रमांक १२६ अंतर्गत वर्षभराचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. एकूण ३९० प्रशिक्षणार्थींमध्ये त्यांनी ९६ वा क्रमांक मिळवला. बुधवार (दि. २४ ) रोजी झालेल्या दीक्षांत समारंभात प्रशिक्षणार्थींना संविधान आणि कर्तव्याची शपथ देण्यात आली. या समारंभानंतर सर्व प्रशिक्षणार्थी कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
शलाका शिरसाठ यांच्या यशाबद्दल मविप्रचे माजी संचालक डॉ. विश्राम निकम, प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, मविप्र संचालक विजय पगार, देवळा बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, नगरसेवक जितेंद्र आहेर, बाजार समितीचे संचालक शाहू शिरसाठ, देवळा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. मालती आहेर, प्रशासकीय अधिकारी बी. के. रौंदळ, प्रा. डॉ. सतीश ठाकरे, डॉ. डी. के. आहेर, डॉ. वसंतराव आहेर, प्रा. योगेश भामरे, डी. आर. अहिरे, बाबुलाल पवार, विजू अहिरे, पी. डी. सागर, एस. बी. काळे, भाऊसाहेब मगर, अशोक मगर, डॉ. अशोक सोनवणे, डॉ. पंकज निकम, डॉ. अरुण निकम, पद्माकर पाटील, दिलीप पाटील, आर. एस. निकम, शरद निकम, मनोज शिरसाठ आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.