Police Pudhari
नाशिक

Nashik Police | नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचे सुरक्षा कवच!

Nashik Police | शहरात अधिकारी - कर्मचारी तैनात; राखिव दलही सज्ज

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था बाधिता राखण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरातील देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी होणारी गर्दी, सार्वजनिक मंडळांचे धार्मिक कार्यक्रम, गरबा - दांडिया आयोजन आणि बाजारपेठांमधील वाढती वर्दळ लक्षात घेऊन विविध ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडावा, यासाठी शहर पोलिस सज्ज झाले आहेत. नवरात्रोत्सवातील गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षा, महिलांच्या सुरक्षतेला प्राधान्य आणि अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे. यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून पोलिस अंमलदारांपर्यंत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तैनात केले आहे.

नियमित पोलिस दलाबरोबर महिला पोलिस, गृहरक्षक दल, राखीव पोलिस दल आणि राज्य राखीव पोलिस दलाचीही मदत घेतली जाणार आहे. शहरातील प्रमुख देवी मंदिरे, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक मंडप आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.

गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध व्हावी, यासाठी बंदोबस्तातील मनुष्यबळाचा उपयोग होणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही आवश्यक नियोजन करण्यावर भर राहणार आहे.
महिला भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिला पोलिस अंमलदारांची स्वतंत्र नियुक्ति केली आहे. गृहरक्षक दलातील महिला आणि पुरुष यांचाही बंदोबस्तात सहभाग असणार आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

पोलिस अधिकारी व कर्मचारी संख्या:

  • पोलिस उपायुक्त : ०४

  • सहाय्यक पोलिस आयुक्त : ०७

  • पोलिस निरीक्षक : ४६

  • सहाय्यक पोलिस निरीक्षक / पोलिस उपनिरीक्षक : २०५

  • पोलिस अंमलदार : १२२०

  • महिला पोलिस अंमलदार : ४३०

  • पुरुष गृहरक्षक दल : ११००

  • महिला गृहरक्षक दल : २५०

  • राखीव पोलिस दल (आरसीपी) : ०२ प्लाटून

  • राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) : ०१ कंपनी (१२० जवान)

  • क्यू.आर.टी. पथक : ०१ पथक (४८ जवान)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT