Nashik Police Commissioner Sandeep Karnik / नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक Pudhari News Network
नाशिक

Nashik Police | 'भाई' नाशिक की, पोलिस बहुत मारती है।

Nashik Police | कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत पोलिसांचा धाक हा गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निखिल रोकडे

कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत पोलिसांचा धाक हा गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. गेल्या दीड वर्षात नशिक शहर आयुक्तालयात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' मोहिमेचा धाक हा केवळ नाशिकपुरता मर्यादित राहिलेला नसून राज्यातील विविध कारागृहांपर्यंत पोहोचल्याची चर्चा गुन्हेगारी विश्वात रंगू लागली आहे. 'भाई, नाशिक की, पोलिस बहोत मारती है।,' 'जप तक सीपी कर्णिक है तब तक नशिक मैं कुछ मत करो', हे वाक्य सध्या अनेक सराईत गुन्हेगारांच्या तोंडी ऐकायला मिळत असल्याची चर्चा आहे.

या पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी राबविलेल्या 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' मोहिमेमुळे शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडल्याचे चित्र दिसून आले. गुन्हे शाखेचे उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी केली.

विशेषतः क्राइम ब्रँच युनिट क्रमांक १ च्या कारवायांनी अनेक गुन्हेगारांना अक्षरशः धास्तावून सोडले. गुन्हेगारी जगतातील अनेक नावाजलेले चेहरे पोलिसांच्या रडारवर आले आणि त्यांच्या कथित दहशतीचा फुगा काही दिवसांतच फुटल्याचे चित्र निर्माण झाले. कारागृहात शिक्षा भोगणारे अथवा न्यायप्रविष्ट आरोपी एकमेकांशी संवाद साधताना विविध जिल्ह्यांतील पोलिसांच्या कार्यपद्धतीची चर्चा करत असतात.

'कुठल्या जिल्ह्यातला?', 'पहिल्यांदाच आलास का?', 'काय गुन्हा केलास?' अशा गप्पांमध्ये नाशिकचा विषय निघाला की सावधगिरीचा इशारा दिला जातो, अशी चर्चा आहे. नाशिकमध्ये सध्या गुन्हे करण्याचा विचारही करू नकोस, असा सल्ला काही सराईत आरोपी नवख्या गुन्हेगारांना देत असल्याचे सांगितले जाते. पूर्वी अनेक गुन्हेगार गुन्हा घडल्यानंतर स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होत असत.

त्यामुळे चौकशीची प्रक्रिया औपचारिक राहायची. मात्र, गेल्या काही काळात गुन्हेगारीविरोधातील आक्रमक मोहिमेमुळे परिस्थितीत झाल्याचे निरीक्षक सांगतात. बदल पोलिसांच्या कारवाईची भीती निर्माण झाल्याने काही गुन्हेगारांनी शहर सोडल्याचीही चर्चा आहे. काहींनी तर नाशिकमध्ये सक्रिय असलेले आपले नेटवर्कच गुंडाळल्याचे बोलले जाते.

गुन्हेगारी विश्वात निर्माण झालेली ही मानसिक दहशत पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे. या मोहिमेत केवळ सराईत गुन्हेगारच नव्हे तर राजकीय पाठबळ असल्याचा आरोप असलेले काही तथाकथित नेतेही पोलिसांच्या कारवाईपासून वाचू शकले नाहीत. त्यामुळे कायद्यापुढे सर्व समान असल्याचा संदेश समाजात गेला.

अनेक वर्षे स्थानिक पातळीवर दबदबा निर्माण करणाऱ्या व्यक्तींनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली. गुन्हेगारांचा प्रभाव कमी झाल्याने अनेक भागांतील नागरिकांनीही दिलासा व्यक्त केल्याचे सांगितले जाते. यामुळे परिणामी, नाशिक पोलिसांचा धाक केवळ शहरापुरता न राहता राज्यातील गुन्हेगारी विश्वात चर्चेचा विषय बनला आहे.

साहेब, या आधी इतका मार नाही

खाल्ला या मोहिमेमध्ये राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व मकोका कारवाई झालेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्याचा पाहुणचार युनिट क्रमांक १ मध्ये सुरू होता. त्यावेळी तो अक्षरशः रडून गयावया करू लागला, आणखी नका मारू त्यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यास विचारले तू तर मोकाचा आरोपी तुला खूप सवय असेल मार खायची तेव्हा तो हात जोडून म्हणाला साहेब, याच्या अगोदर एवढा मार पोलिसांकडून मी कधीच खाल्ला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT