Traffic Diversion Pudhari
नाशिक

Traffic Diversion | दिवाळी खरेदीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विशेष वाहतूक बदल; सात प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी

Traffic Diversion | सात मार्गांवर प्रवेशबंदी; पर्यायी मार्गाचा वापर करावा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजनाची विशेष अधिसूचना जारी केली आहे. रविवार कारंजा, शालिमार, मेन रोड, सांगली बँक परिसरासह मध्यवर्ती बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची आणि वाहनांची संख्या वाढणार असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सात प्रमुख मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे.

नाशिक शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त (मुख्यालय / वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दि. ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० पर्यंत संबंधित मार्गांवर वाहतूक निबंध लागू राहतील.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना सुरक्षितपणे खरेदी करता यावी, पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊ नये तसेच व्यापारी भागातील वाहतूक सुरळीत राहावी, हा या नियोजनामागील मुख्य उद्देश आहे.

प्रवेश बंद असलेले सात मार्ग:

  • ३ ते ११ नोव्हेंबर - सकाळी १० ते रात्री १०.

  • मालवीय स्टँड ते रविवार कारंजांकडे जाणाऱ्या - येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

  • दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंटकडे जाणाऱ्या - येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद.

  • रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिर भद्रकालीकडे जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.

  • बालाजी मंदिर ते गाडगे महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.

  • नेहरू चौक ते म. गां. रोड - मेन रोड - धुमाळ पॉईंटकडे जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.

  • सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंटकडे जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.

  • रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंटकडे जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग:

  • मालवीय स्टँड - मखमलाबाद नाका - रामवाडी - बायजाबाई छत्रपती - चोपडा लॉन्स - गंगापूर नाकामार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

  • पंचवटीकडून मेन मार्केटकडे येणारे वाहने संतोष टी पॉईंट, द्वारकामार्गे इच्छित स्थळी जातील.

  • जुने नाशिक परिसरात जाण्यासाठी सीबीएसई - शालिमार - खडकाळी सिग्नल - सारडा सर्कल या मार्गाचा वापर करावा.

  • वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांनी सूचित केलेल्या इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.

निबंधिट मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. दरम्यान, बाजारपेठ परिसर येथे येणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली आहे. शालिमार येथील बी.डी. भालेकर मैदान, रविवार कारंजा, गाडगे महाराज पुतळ्याजवळील जागा आणि स्मार्ट सिटीच्या मार्किंग केलेल्या पार्किंगमध्ये वाहने उभी करण्याचे निर्देश दिले आहेत.

पार्किंग व्यवस्था:

  • बी. डी. भालेकर मैदान, शालिमार

  • रविवार कारंजा

  • गाडगे महाराज पुतळ्याजवळील जागा

  • स्मार्ट सिटीच्या मार्किंग केलेल्या पार्किंगच्या जागा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT