Maharashtra Police Pudhari News Network
नाशिक

Nashik Police Advisory | पीडित महिलांची ओळख उघड करू नका! नाशिक पोलिसांचे प्रसारमाध्यमे आणि नागरिकांना कडक आवाहन

Nashik Police Advisory | महिला लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीडितांची ओळख उघड होणार नाही, याची काळजी घेण्याचे कडक आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिला लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पीडितांची ओळख उघड होणार नाही, याची काळजी घेण्याचे कडक आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील प्रकरणात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झाले असून, त्याचा तपास विशेष तपास पथकमार्फत सुरू आहे.

दरम्यान, काही वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बातम्या प्रसारित करताना पीडित महिलांची ओळख पटेल असे व्हिडिओ, फोटो किंवा मजकूर प्रसिद्ध होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. कोणत्याही पीडित महिलेची ओळख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उघड करणे हा गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे.

अशा प्रकारच्या वृत्तांकनामुळे संबंधित महिलांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. तसेच त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेवरही परिणाम होतो. यामुळे इतर पीडित महिलाही तक्रार देण्यास घाबरतात, ज्याचा परिणाम तपास प्रक्रियेवर होऊ शकतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस प्रशासनाने नागरिक, वृत्तवाहिन्यांचे संपादक, पत्रकार तसेच सोशल मीडिया (इन्स्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक आदी) आणि न्यूज पोर्टल चालकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, पीडितेची किंवा तिच्या कुटुंबीयांची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती, छायाचित्र किंवा व्हिडिओ प्रसारित करू नये. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT