Nashik News  
नाशिक

Nashik News | रिंग रोडसाठी मनपा हद्दीत 16 कि.मी. रस्त्याचे भूसंपादन

Nashik News | नाशिक परिक्रमा मार्गाला वेग; बाह्य रिंग रोडसाठी महापालिका हद्दीत १६ किमीचे भूसंपादन होणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात बाह्य रिंग रोडच्या कामाला महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) चालना दिली आहे. ६६.५ किलोमीटरच्या या रिंग रोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

यापैकी १६ किलोमीटरचा रिंग रोड महापालिका हद्दीतून जात असल्यामुळे या भूसंपादनासाठी एमएसआयडीसीने महापालिकेची मदत मागितली आहे. तूर्त तीन किलोमीटरचा रस्ता महापालिकेने संपादित केलेला असून, त्या रस्त्याच्या मोबदल्याचा प्रस्ताव एमएसआयडीसीला सादर केला जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे रिंग रोडसाठी जागा भूसंपादित करण्यासाठी एमएसआयडीसी महापालिकेकडे मदतीची मागणी केली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीचे नियंत्रण करण्याबरोबर वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी नाशिक परिक्रमा मार्ग अर्थात बाह्य रिंग रोड तयार केला जात आहे.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागापाठोपाठ केंद्रानेही मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) रिंगरोड विकसित करण्यासाठी पहिली निविदा प्रसिद्ध केली आहे.

रिंग रोडच्या कामांचे सात टप्पे करण्यात आले असून, ६६.५ किलोमीटर लांबीच्या रिंग रोडच्या ३३०० कोटींच्या कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. यात १६ किलोमीटरचा रिंग रोड हा महापालिकेच्या हद्दीतून जाणार आहे.

त्यामुळे महापालिका हद्दीतील जागा भूसंपादित केला जाणार आहे. त्यातील तीन किलोमीटरची जागा महापालिकेच्या ताब्यात आधीच आहे. त्यामुळे उर्वरित १३ किलोमीटर अंतरावरील जागेचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेने मदत करावी अशी मागणी एमएसआयडीसीने केली आहे. त्यानुसार महापालिका येथील शेतकऱ्यांची माहिती एमएसआयडीसीला देणार असून, तीन किलोमीटर अंतरावरील भूसंपादनाचाही मोबदला पालिका घेणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT