वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्ताने वृत्तपत्र विक्रेता बांधवांचा सत्कार  Pudhari News network
नाशिक

Nashik | वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेकडून वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

वृत्तपत्र विक्रेता दिन : वृत्तपत्र विक्रेता बांधवांसह महिला भगिनींही सन्मानित

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्ताने सिडको, विनयनगर येथील उत्कर्ष मंगल कार्यालयात वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था नवीन नाशिक (सिडको) नाशिक संस्थेतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर सन्मान दिन आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम व संस्थेचे माजी दिवंगत सचिव कै. कैलास बच्छाव यांचे प्रतिमापूजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी जयप्रकाश पवार, निवासी संपादक (दै. दिव्य मराठी), देवदत्त जोशी (प्रसाद एजन्सीज), नाना कानडे (राजेंद्र ट्रान्सपोर्ट), संतोष लोहकरे (टाइम्स समूह), बळीराम पवार (दै. सकाळ), कैलास बडगुजर (दै. पुण्यनगरी), नीलेश कुंभकर्ण (दै. दिव्यमराठी), शाम जाधव (दै.लोकमत), योगेश कोथमीरे (दै. लोकमत), स्वनिल शेळके (टाईम्स ग्रुप), बंटी पवार (टाईम्स ग्रुप), प्रसाद क्षत्रिय (दै. लोकसत्ता), गणेश चव्हाण (दै. सकाळ), दिलीप गुरकूल (दै. पुढारी), प्रशांत अहिरे (दै. देशदूत), पप्पू डहाळे (राजेंद्र ट्रान्सपोर्ट), आर. आर. पाटील (दै. सामना), चंद्रकांत पवार (अध्यक्ष, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना, सुनील मगर (अध्यक्ष, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था) हे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था नाशिक (सिडको) चे अध्यक्ष दत्तात्रय ठाकरे, उपाध्यक्ष बाळु सुर्यवंशी, सचिव चंद्रकांत बोरसे, सचिव किरण कर्जोतकर, खजिनदार संजय शेलार, भुषन कांबळे, अतुल शिरोडे, देविदास खालकर आदींनी परिश्रम घेतले.

वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्ताने वृत्तपत्र विक्रेता भगिनींनाही सन्मानित करण्यात आले

महिला वृत्तपत्र विक्रेत्या भगिनीही सन्मानित

सुमन त्र्यंबके, मंदा रहाटळ, शकुंतला चौधरी, मनिषा नेर, शोभा संलंत्री, वर्षा देऊगावकर, सोनाली देसाई, सुनिता जाधव, सुवर्णा सूर्यवंशी, सुनीता कर्जेदकर, वैशाली हाडोळे, विजया वाळेकर, उज्वला चव्हाण, पल्लवी कर्पे, प्राची कांबळे, मनिषा बोरसे, गायत्री कोपळ, वर्षा पात्रीकर, सुवर्णा ठाकरे, रिया गायकवाड, गायत्री कुंभार्डे, गौरी महाजन, रेखा शेलार, प्रियंका शिरोडे

वृत्तपत्र विक्रेता बांधवांचाही सत्कार

अनिल चौधरी, बाळकृष्ण नेर, हरिदास भालके, शिवाजी गायकवाड, आर. पी. बच्छाव, सुदाम रहाटळ, अजय बागुल, अरूण पात्रीकर, बापु कुंभार्डे, दिनकर जाधव, गणेश गोसावी, जीवन वाळेकर, प्रशांत देसाई, सुनील जाधव, सचिन बागुल, अमोल शिंपी, अशोक अहिरराव, जयंत पाटील, मयूर गायकवाड, नितीन इघे, प्रशांत जोशी, प्रविण चौधरी, प्रविण कर्पे, शुभम जाधव, रवींद्र वाघ, सचिन महाजन, समाधान धाडीवाल, संपत जायभावे, संदीप क्षीरसागर, संतोष देव्हारे, संतोष जाधव, शाम कोपळ, सिध्दार्थ शार्दुल, विनोद चव्हाण, विनोद सलंत्री, संदिप मढवई, राहुल दूशिंग, सचिन शेटे, अण्णा भांड, नविनकुमार बाफना, तुकाराम पाटील, विकी वाळुंज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT