विणकर शिष्टमंडळ
दिल्ली : केंद्रीय वस्त्रद्योग मंत्री गिरिराज सिंह यांना निवेदन सादर करताना विणकर शिष्टमंडळ. pudhari news network
नाशिक

Nashik News | विणकरांना तत्काळ ओळखपत्र मिळावे - विणकर शिष्टमंडळ

पुढारी वृत्तसेवा

येवला : तालुका व परिसरातील विणकर बांधवांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता ऑगस्ट २०२३ मध्ये विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्या मार्फत विणकर ओळखपत्र डाटा तयार करून सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे विणकरांना विणकर ओळखपत्र तत्काळ मिळावे, अशी मागणी येवला शहर विणकर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत भाजप नाशिक उत्तर जिल्हा महामंत्री आनंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय मजदूर संघाचे श्रावण जावळे, भाजप येवला शहर विणकर अध्यक्ष नीलेश परदेशी, सचिन खरात यांनी यांनी केंद्रीय वस्त्रमंत्री गिरिराज सिंह याची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

तालुका येथे पैठणी रेशीम साडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. हा व्यवसाय शेती व्यवसायानंतर सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा आहे. येवला शहरासह ग्रामीण भागातही सुमारे १० हजार विणकर वाढले असून, ५० हजार लोकांना रोजगारनिर्मिती करून दिली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आकडेवारीप्रमाणे अंदाजे ३ हजार ६०० विणकरांना विणकर ओळखपत्र वाटप झाले आहे. अंदाजे ६ हजार ४०० विणकर बांधवांना अद्यापही ओळखपत्र मिळाले नाही. ऑगस्ट २०२३ मध्ये तत्कालीन खासदार डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून केंद्रीय विधीत नमुन्यात विणकर ओळखपत्र डाटा तयार करून विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्या मार्फत नवी दिल्ली येथील हातमाग आयुक्तांकडे सादर केले आहे. त्या विणकरांना ओळखपत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे हे विणकर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. या विणकरांना तत्काळ विणकर ओळखपत्र देऊन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीचा निर्णय व्हावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

SCROLL FOR NEXT