नाशिक

Nashik News I मालेगाव-नांदगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स बस आगीत खाक

अंजली राऊत

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव रोडवर जाटपाडे गावाजवळ चालत्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली, तर कुठलीही जीवितहानी झाली नाही. उज्जैनहून पुणेकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्सच्या बस (एमपी १३ पी ८९९९) ही मालेगावहून नांदगावकडे जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास जाटपाडे गावाजवळ चालत्या बसने पेट घेतला. चालकाने सावधानतेने बस थांबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. यामुळे जीवितहानी झाली नाही; परंतु बस पूर्णपणे जळाल्याने बसमधील पार्सल जळून खाक झाले. मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. बसचालक अजय जगन्नाथ लोहरे (रा. मुकुंदपुरा, मध्य प्रदेश) याने तालुका पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस नाईक सी. एच. कन्नोर करीत आहेत.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT