नाशिक : खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर आंदोलन करताना सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक

Nashik News | सकल मराठा समाजाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : रक्षाबंधनाच्या दिवशी गरीब मराठा बांधवाला आरक्षणरुपी राखी बांधून मराठा बांधवाचे जीवनसुखी करा, मराठा समाजाला ओबीसीतून 50 टक्के आरक्षण द्या या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यासमोर आंदोलन करण्यात आले. रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि.19) मविप्र संस्थेच्या समाजदिन कार्यक्रमासाठी खा. सुळे आल्या असता त्यांच्यासमोर ही घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी खा. सुळे यांच्याकडे पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करुन तत्काळा घोषणा करा. आपल्या पक्षाला लोकसभेत मराठ्यांनी भरभरुन मतदान केले. पक्षाचे खासदार निवडून आणले आता राष्ट्रवादीने मराठा समाजाच्या न्यायिक मागणीला पाठिंबा द्यावा, आवाज उठवून सत्ताधाऱ्यांना जाब विचारावा. महाविकास आघाडीचे 30 खासदारांसह पंतप्रधानांना भेटून आरक्षणाचा प्रश्न सोडवावा या मागणीचे निवेदनही खा. सुळे (MP Supriya Sule) यांना देण्यात आले. या आंदोलनप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, नानसाहेब बच्छाव, नवनाथ शिंदे, किरण डोके, सुभाष गायकर, सचिन पवार, योगेश कापसे, योगेश गांगुर्डे, योगेश पाटील, संगीता सूर्यवंशी, रागिणी आहेर, भारत पिंगळे, संदीप फडोळ, चेतन शेवाळे आदी उपस्थित होते.

दोन दिवसांत मुख्यमंत्र्याना भेटणार

खा. सुळे यांनीही मराठा समाजाला आश्वस्त करताना, पुढील दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य सरकारची भूमिका काय आहे हे बघून पंतप्रधानांची भेट घेण्यात येईल. जे काही करता येईत ते नक्की करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी सकल मराठा समाजाला दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT