पावसाने उघडीप दिल्याने कांदा लागवडीला वेग file photo
नाशिक

Nashik News | पावसाने उघडीप दिल्याने कांदा लागवडीला वेग

Onion cultivation | आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर लागवड

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे लाल कांदा लागवडीला वेग आला आहे. मालेगाव, चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले होते. त्यानंतर जुलैच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाल्यानंतर पावसाच्या पाण्यावर कांद्याची लागवड करण्यात आली. मात्र, ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस झाल्याने कांदा लागवड थांबविण्यात आली होती. आता पावसाने उघडीप घेतल्याने कांदा लागवडीला पुन्हा वेग आला आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर कांदा लागवडी झाल्या आहेत. लागवडी सुरू असल्याने त्यात वाढ होणार आहे.

लाल कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याची दरवर्षी आघाडी असते. सरासरी २० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. मात्र सुरुवातीला काही ठिकाणी पावसाचे कमी प्रमाण तर काही ठिकाणी अतिवृष्टी यामुळे लागवडीचे नियोजन कोलमडले. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी कांदा रोपांचे नियोजन करून लागवडी केल्या आहेत.

पेरणी तालुकानिहाय (हेक्टरमध्ये)

निफाड : ४२, सिन्नर : ३९३.७, येवला : २६१२, चांदवड : ४४६८, मालेगाव : ४११०, सटाणा : १८०, नांदगाव : ३५, देवळा : ८०१ एकूण : १२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT