नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, एच. सी .जी. मानवता कॅन्सर सेंटर, व शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शहरात सायकल रॅली काढण्यात आली. 'तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांवरील उद्योग धोरणांच्या युक्त्यांचा पर्दाफाश करणे' अशी यावर्षीची संकल्पना आहे.
तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम याविषयी जनजागृतीपर सायकल व बाईक रॅली काढण्यात आली. त्यामध्ये सायकलिस्ट, महिला, डॉक्टर्स, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एचसीजी मानवता हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. राज नगरकर, आयएमए नाशिक रोड शाखेच्या अध्यक्षा डॉ. कांचन लोकवाणी, शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्थाच्या अध्यक्षा संगीता गायकवाड, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या उपाध्यक्षा डॉ. मनीषा रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे नियोजन करण्यात आले. यावेळी तंबाखूजन्य तसेच अंमली पदार्थांचे दुष्परिणाम यावर पथनाट्य सादर झाले.
डॉ. नगरकर यांनी उपस्थितांना 'देश तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहील यावर प्रतिज्ञा दिली. ‘नशे को छोडो, जिंदगी को चूनो’, ‘से नो टू टोबॅको, एस टू लाईफ’ या घोषणा रॅलीतून देण्यात आल्या.