New MIDC Police Station Nashik 
नाशिक

New MIDC Police Station Nashik | एमआयडीसी ठाण्यांतर्गत चार पोलिस चौक्या

New MIDC Police Station Nashik | मनुष्यबळ प्राप्त होताच होणार कामकाजाला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

सिडको : राजेंद्र शेळके

परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी शासनाने अंबड व सातपूर पोलिस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याची निर्मिती केली आहे. या नव्या पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू झाले असून मनुष्यबळ प्राप्त होताच चार नव्या पोलिस चौक्या उभारण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांनी दिली

अधिक माहिती देताना नरुटे यांनी सांगितले की, नागरिकांना पोलिसांशी सुलभ संपर्क साधता यावा, यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होताच चार नवीन पोलिस चौक्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या चौक्यांमुळे स्थानिक स्तरावर पोलिसांची उपस्थिती वाढणार असून गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल.

पोलिस ठाणे हद्दीतील जाधव संकुल, एक्सलो पॉइंट, दत्तनगर आणि बेळगाव ढगा या ठिकाणी या चौक्यांची स्थापना केली जाणार आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय एमआयडीसी पोलीस ठाणे नव्या पोलिस ठाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण होण्यास मदत होणार असून, पोलिस नागरिक संवाद अधिक मजबूत होईल. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत निश्चितच सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

स्वतंत्र पोलिस ठाण्यासाठी नवीन अद्ययावत इमारत उभारली पाहिजे. संजीवनगर स्टॉप परिसरात पोलिस चौकी उभारली पाहिजे.
- अविनाश शिंदे, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना
घरकुल योजना तसेच रामकृष्णनगर परिसरात नागरिकांना पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याशी त्वरित संपर्क साधण्यासाठी पोलिस चौकी उभारली पाहिजे.
-निवृत्ती इंगोले, नगरसेवक
66 नव्याने निर्मिती करण्यात आलेल्या एमआयडीसी पोलिस ठाण्याला मंजूर असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी मिळाल्यास बालाजी पार्क, चुंचाळे मनपा शाळेजवळ म्हाडा या भागात पोलिस चौकी उभारावी व पोलिस गस्त वाढवण्यात आली पाहिजे.
- भागवत आरोट, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT