Jalna News : लाचखोर अधिकाऱ्यांना १२ जून पर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश file photo
नाशिक

Kiran Rajwade Caste Certificate | नाशिकमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का! नगरसेवक किरण राजवाडे यांचे जात प्रमाणपत्र अवैध; पद रद्द होणार

Kiran Rajwade Caste Certificate | त्यामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर आले असून पद रद्द होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महानगरपालिकेतील सिडको प्रभाग क्रमांक २७ (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर ठाकूर अनुसूचित जमातीच्या आरक्षणातून निवडून आलेले नगरसेवक किरण वसंतराव राजवाडे यांचा आदिवासी ठाकूर जमातीचा दावा अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवला आहे. त्यामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर आले असून पद रद्द होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी किरण राजवाडे हे बोगस आदिवासी असून ते ओबीसी प्रवर्गातील भाट समाजाचे असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत समितीने सखोल चौकशी करत दोन्ही पक्षकारांना सुनावणीची संधी दिली.

समितीचे उपाध्यक्ष किरण माळी, सदस्य सचिव प्रदीप पोळ आणि सदस्य शालिनी राऊत यांनी दिलेल्या आदेशानुसार किरण राजवाडे यांचा ठाकूर अनुसूचित जमातीचा दावा अवैध ठरविण्यात आला आहे. तसेच चांदवड प्रांताधिकाऱ्यांनी जारी केलेले त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याच प्रकरणात साक्षी राजेंद्र राजवाडे, धनंजय भाऊसाहेब राजवाडे आणि सुलभा भाऊराव राजवाडे यांना मिळालेले जात वैधता प्रमाणपत्रही दिशाभूल करून प्राप्त केल्याचे समितीच्या निदर्शनास आल्याने ती प्रमाणपत्रेही रद्द करण्यात आली आहेत. संबंधितांनी ही प्रमाणपत्रे शैक्षणिक प्रवेश, नोकरी किंवा अन्य शासकीय लाभांसाठी वापरली असल्यास त्याबाबत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या निर्णयानंतर आदिवासी युवा नेते लकी जाधव यांनी समाधान व्यक्त करत खऱ्या आदिवासींचे हक्क हिरावून घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची भूमिका मांडली. किरण राजवाडे यांच्याविरोधात अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अन्य फौजदारी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नगरसेवक पदाबाबत पुढील प्रशासकीय प्रक्रिया आणि संभाव्य कायदेशीर लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनपा निवडणुकीत राजवाडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे लक्षात आले होते . अखेर न्यायदेवतेने न्याय दिला आहे .
ज्योती कवर , भाजपा महिला आघाडी पदाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT