highway Pudhari
नाशिक

Nashik Nanduri highway Updates |नाशिक-नांदुरी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग; कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून थेट पाहणी

Nashik Nanduri highway Updates | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचाली तीव्र; रस्ता रुंदीकरणाचा घेतला सविस्तर आढावा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक - नांदुरी रस्ता रुंदीकरण कामाची तृतीय पक्ष गुणवत्ता नियंत्रण पथकासह नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. ११) सकाळी पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, कुंभमेळा प्राधिकरणाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि तृतीय पक्ष गुणवत्ता नियंत्रण पथकाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि तृतीय पक्ष गुणवत्ता नियंत्रण पथकातील अधिकाऱ्यांसह कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी रस्ता रुंदीकरण कामाची भौतिक प्रगती, बांधकामाची गुणवत्ता आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला.

तसेच युटिलिटी स्थलांतर, भूसंपादनाशी संबंधित बाबी, कामातील अडथळे आणि काम पूर्ण करण्याचे नियोजित वेळापत्रक याबाबतही माहिती घेतली. तसेच गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेची पाहणी करून कामाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित तांत्रिक निकष, गुणवत्ता मानके आणि लागू नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. बांधकाम गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचेही शेखर सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

वेळेचे बंधन

रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, कंत्राटदार, आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेने परस्पर समन्वयाने काम करावे, कामातील अडथळे तातडीने दूर करावेत आणि नियोजित वेळापत्रकानुसार कामाची प्रगती सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. कामाची भौतिक प्रगती, गुणवत्ता नियंत्रणाची कारवाई आणि अपेक्षित पूर्णत्वाचा कालावधीसह प्रकल्पाची अद्ययावत माहिती नियमित उपलब्ध ठेवण्याचेही निर्देशही सिंह यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT