Nashik Municipal Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Water & Light bill fake message|घरपट्टी-पाणीपट्टी धारकांना मनपाच्या नावाने बनावट संदेश; नागरिकांनी काय दक्षता घ्यावी?

Nashik Municipal|घरपट्टी-पाणीपट्टी धारकांची ऑनलाइन फसवणूक, गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टी संदर्भात ऑनलाइन फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. मनपाच्या नावाने बनावट संदेश पाठवून दिशाभूल केली जात आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांना त्यांच्या घरपट्टी व पाणीपट्टीचे इंडेक्स (अनुक्रमांक) अद्ययावत नसल्याचे सांगून ते अद्ययावत करण्यासाठी विशिष्ट भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करणारे संदेश पाठवले जात आहेत.

हे संदेश ९३४११९८०९६ या बनावट क्रमांकावरून पाठवण्यात आल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, ज्या बनावट क्रमांकावरून हे संदेश पाठविले जात होते, तो क्रमांक सायबर पोलिसांच्या मदतीने बंद करण्यात आला आहे. या प्रकारामागील संबंधितांचा शोध घेत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मनपाच्या कर विभागाने दिली महापालिकेने नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टीबाबतच्या अफवा किंवा संशयास्पद संदेशांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. अशा संदेशांना कोणताही प्रतिसाद देऊ नये तसेच कोणतीही आर्थिक किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असेही स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी काय करावे

अनोळखी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये. बँक, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. शंका असल्यास थेट महापालिकेशी संपर्क साधावा.

घरपट्टी व पाणीपट्टीधारकांना इंडेक्स क्रमांकाबाबत कोणतेही संदेश पाठवले जात नाहीत. नागरिकांनी अशा संदेशांना बळी पडू नये. अनोळखी क्रमांकावर संपर्क साधू नये. वैयक्तिक माहिती देऊ नये.

- मनीषा खत्री, आयुक्त, मनपा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT