नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Elections : अंतिम मतदार यादीत 6,645 मतदार वाढल्याने कितीजण मतदानाचा हक्क बजावणार ?

एकूण 13.60 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार

पुढारी वृत्तसेवा

13 lakh 60 thousand 772 voters will exercise their right to vote for the Nashik Municipal Election

नाशिक : नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी सोमवारी (दि.२०) प्रसिध्द करण्यात आली. प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत अंतिम मतदार यादीत ६६४५ मतदार वाढले असून आता महापालिकेच्या १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत तब्बल १३ लाख६० हजार ७२२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

हरकतींच्या पडताळणीअंती जवळपास सर्वच प्रभागांमधील मतदार संख्येत बदल झाला आहे. प्रभाग क्रमांक ३१ मध्ये सर्वाधिक ६५३३ मतदार वाढले असून प्रभाग १० मधील ५३३३ मतदार कमी झाले आहेत. गत २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत यंदा एकूण २ लाख ८७ हजार ३१४ मतदार वाढले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकी घोषणा निवडणूक आयोगामार्फत करण्यात आली असून त्यानुसार येत्या १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणुकांसाठी प्रभागरचना अंतिम करण्यात आली असून प्रभागनिहाय राखीव जागांची आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी गेल्या २० नोव्हेंबरलाप्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार, मयत मतदारांचा समावेश असल्याने त्यावर हरकती व सूचनांचा अक्षरश: पाऊस पडला. तब्बल ९७१७ विक्रमी हरकती प्राप्त झाल्या होत्या. महापालिका निवडणुकीच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती व सूचना प्राप्त झाल्याने अंतिम मतदार यादी प्रसिध्दीला पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी (दि. १५) प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत अंतिम मतदार यादीतील मतदार संख्येत ६ हजार ६४५ ने वाढ झाली असून महापालिका निवडणुकीसाठी १३ लाख ६० हजार ७७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हरकतींच्या पडताळणीनंतर सर्वच प्रभागांमधील मतदारसंख्येत बदल झाला आहे. काही प्रभागांची मतदार संख्या वाढली तर काही प्रभागांमधील मतदारसंख्या घटली आहे.

प्रभाग २२ सर्वात कमी, २५ सर्वाधिक मतदारसंख्येचा

  • प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांनुसार नाशिक महापालिका क्षेत्रातील ३१ प्रभागांच्या तुलनेत प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्वात कमी ३१ हजार ५२१ मतदार होते.

  • अंतिम मतदार यादीत मात्र प्रभाग क्रमांक २२ हा सर्वात कमी ३३,७९८ मतदार संख्येचा ठरला आहे.

  • प्रभाग क्रमांक ९ मधील मतदार संख्या ४२९९ ने वाढून ३५८२० इतकी झाली आहे.

  • अंतिम मतदार यादीत प्रभाग २५ मधील मतदारसंख्या २१४५ ने घटली असली तरी ५६,१०१ मतदार असलेला हा प्रभाग सर्वाधिक मतदार संख्येचा ठरला आहे.

  • प्रभाग २५ मध्ये सर्वाधिक २९००३ पुरूष मतदार तर सर्वाधिक २७,०९८ मतदार आहेत.

प्रभागनिहाय मतदारसंख्या अशी

  • प्रभाग १- ४४६०३ मतदार

  • प्रभाग २- ४५९२८ मतदार

  • प्रभाग ३- ५०२७८ मतदार

  • प्रभाग ४- ४१७४६ मतदार

  • प्रभाग ५- ४३७२४ मतदार

  • प्रभाग ६- ४९९६३ मतदार

  • प्रभाग ७- ४१७२९ मतदार

  • प्रभाग ८- ३६३७९ मतदार

  • प्रभाग ९- ३५८२० मतदार

  • प्रभाग १०- ४१३१३ मतदार

  • प्रभाग ११- ४२९६५ मतदार

  • प्रभाग १२- ४०७९३ मतदार

  • प्रभाग १३- ४९३३३ मतदार

  • प्रभाग १४- ५०४३४ मतदार

  • प्रभाग १५- ४१९२१ मतदार

  • प्रभाग १६- ३७९४६ मतदार

  • प्रभाग १७- ४६३९३ मतदार

  • प्रभाग १८- ३८७२२ मतदार

  • प्रभाग १९- ३५९६५ मतदार

  • प्रभाग २०- ३५४२५ मतदार

  • प्रभाग २१- ४१९१६ मतदार

  • प्रभाग २२- ३३७९८ मतदार

  • प्रभाग २३- ४९६५५ मतदार

  • प्रभाग २४- ४७७६७ मतदार

  • प्रभाग २५- ५६१०१ मतदार

  • प्रभाग २६- ४२१०६ मतदार

  • प्रभाग २७- ३६४८७ मतदार

  • प्रभाग २८- ५०२८५ मतदार

  • प्रभाग २९- ४६५५० मतदार

  • प्रभाग ३०- ५३२७४ मतदार

  • प्रभाग ३१- ५१४०३ मतदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT