नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी चौथ्या दिवसाअखेर १२८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारी (दि.२७) एकाच दिवशी १०४ अर्ज दाखल झाले. दरम्यान, आतापर्यंत एकूण ५४०६ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. रविवारी निवडणूक कार्यालयाला सुटी आहे. सोमवारी(दि.२९) अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी १७६३ अर्जांची विक्री झाली. तर प्रभाग क्रमांक तीन मधून एक अर्ज दाखल झाला. २४ डिसेंबरला १९४२ अर्जांची विक्री झाली तर प्रभाग २ मधून एक व प्रभाग ११ मधून दोन असे एकूण तीन अर्ज दाखल झाले. २५ डिसेंबरला नाताळाची सुट्टी होती. २६ डिसेंबरला ११४६ अर्जांची विक्री झाली तर २० अर्ज दाखल झाले. शनिवारी, २७ डिसेंबरला ५५३ अर्जांची विक्री झाली. तसेच १०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
आतापर्यंत सर्वच ३१ प्रभागांमधून एकुण १२८ अर्ज दाखल झाले. प्रभाग दोन मध्ये आतापर्यंत सात अर्ज दाखल झाले आहेत. प्रभाग तीन मध्ये चार, प्रभाग चार मधून दोन, प्रभाग सहा पाच, प्रभाग सात मधून दोन, प्रभाग आठ मधून पाच, दहा मध्ये एक, प्रभाग अकरा मध्ये सहा, प्रभाग १२ मध्ये चार, प्रभाग १३ मधून तीन, प्रभाग १४ मधून नऊ, प्रभाग सोळा मधून दोन, प्रभाग १७ चार, प्रभाग १८ मधून सहा उमेदवारी अर्ज दाखल आहेत. प्रभाग १९ मध्ये सात, प्रभाग २१ मध्ये १३, प्रभाग 23 मध्ये एक, प्रभाग २४ मधून एक, प्रभाग २५ मधून १२, प्रभाग २६ मध्ये सहा, २७ मध्ये चार, प्रभाग २८ मध्ये पाच, प्रभाग २९ मध्य ११, प्रभाग ३० मध्ये तीन, प्रभाग ३१ सात अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण १२८ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. प्रभाग १, ५, ९, १५ व २० मधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.