माजी महापौर अशोक मुर्तडक  pudhari photo
नाशिक

Nashik Municipal Election : माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांची भाजपकडून हकालपट्टी

55 आजी-माजी पदाधिकाऱ्यांनाही दाखवला घरचा रस्ता

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिका निवडणुकीचे मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह तब्बल 20 माजी नगरसेवकांवर भाजपने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या 55 आजी-माजी पदाधिकाऱ्यांनादेखील पक्षाने घरचा रस्ता दाखवला आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी ‌‘100 प्लस‌’चा नारा देणाऱ्या भाजपमध्येच सर्वाधिक बंडखोरी झाली. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक लढवण्याची 1,067 जणांनी तयारी दर्शवली होती. परंतु, निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने अन्य पक्षातील आयारामांना घेत, तिकीटवाटपातही त्यांनाच प्राधान्य दिले. त्यामुळे तिकीटवाटपावरून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी उफाळून आली.

भाजपने अन्य पक्षातून आलेल्या 33 जणांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंतांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. त्यात एबी फॉर्म वाटप वेळी झालेला राडा, प्रभाग 13 वरून भाजप कार्यालयासमोर रंगलेले नाट्य आणि पाठोपाठ शहराध्यक्ष सुनील केदार यांना कोंडून ठेवणे आणि गाजर देण्याच्या घटनांमुळे भाजपची चांगलीच नामुष्की झाली होती. त्यात निष्ठावंतांनी आणि उमेदवारीच्या आशेने अन्य पक्षांतून आलेल्या माजी नगरसेविकांनी बंड करत भाजपच्याच उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे.

त्यामुळे या बंडोबांची भाजपने अखेर मतदानाच्या तीन दिवस आधी दखल घेत त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणे, पक्षशिस्त मोडणे, अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवल्यामुळे या सर्वांवर हकालपट्टीची कारवाई केल्याची माहिती केदार यांनी दिली आहे.

यांच्यावर झाली हकालपट्टीची कारवाई

अशोक मुर्तडक, कमलेश बोडके, अमित घुगे, सतीश सोनवणे, पूनम सोनवणे, रुची कुंभारकर, सुनीता पिंगळे, शशिकांत जाधव, मीरा हांडगे, अंबादास पगारे, अलका अहिरे, मुकेश शहाणे, पंडित आवारे, राजेश आढाव, अनिल मटाले, कन्हैया साळवे, वंदना मनचंदा, दिलीप दातीर, शीला भागवत, नंदिनी जाधव, जितेंद्र चोरडिया, सचिन मोरे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, बाळासाहेब पाटील, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दीक्षित, दामोदर मानकर, रतन काळे, ऋषिकेश आहेर, ऋषिकेश डापसे, कैलास अहिरे, सतनाम राजपूत, गणेश मोरे, किरण गाडे, मंगेश मोरे, शालिग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगिता राऊत, बाळासाहेब घुगे, शंकर विधाते, प्रेम पाटील, रत्ना सातभाई, सविता गायकर, राहुल कोथमिरे, शीतल साळवे, एकनाथ नवले यांचा समावेश आहे.

पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणे, पक्षशिस्त मोडणे, तसेच अपक्ष किंवा इतर पक्षांकडून निवडणूक लढवल्यामुळे या सर्वांवर हकालपट्टीची कारवाई केली आहे.
सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT