नाशिक: महिला व बालकल्याण समितीवर नियुक्त झालेल्या नगरसेविकांसमवेत महापौर हिमगौरी आहेर-आडके. समवेत मनपा आयुक्त मनीषा खत्री आदी. 
नाशिक

BJP dominance in Nashik NMC - विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व

महिला बालकल्याण, शहर सुधारणा, वैद्यकीय-आरोग्य, विधी व शिक्षण समितीची घोषणा, नऊ सदस्यीय समित्यांत भाजपचे प्रत्येकी पाच, शिंदे गटाचे २ तर उबाठा व राष्ट्रवादीचा १ सदस्य

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेतील सत्ता स्थापनेनंतर सहा महिन्यांनी महापौर हिमगौरी आडके यांनी महिला व बालकल्याण समितीसह शहर सुधारणा, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य, विधी आणि शिक्षण समितीची घोषणा गुरुवारी (दि.२०) महासभेत केली. महापालिकेतील राजकीय संख्याबळाच्या आधारे या समित्यांवर सदस्य नियुक्ती केल्याने या पाचही समित्यांवर सत्तारुढ भाजपने वर्चस्व राखले आहे. नऊ सदस्यीय समित्यांवर भाजपचे प्रत्येकी पाच, शिवसेना शिंदे गटाचे दोन, तर उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रत्येकी एक सदस्य नियुक्त करण्यात आला आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारीत पार पडल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींची निवड झाली होती. विषय समित्यांच्या नियुक्त्या मात्र रखडल्या होत्या. त्यामुळे नगरसेवकांत असंतोष होता. गुरुवारी (दि.२०) झालेल्या महासभेत या नियुक्त्या घोषित केल्या गेल्या. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार पक्षीय व गटांचे संख्याबळ लक्षात घेत प्रमाणशीर प्रतिनिधित्व देत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या करताना सत्तारुढ भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व या समित्यांवर दिसत असून, विरोधी पक्षातून केवळ उबाठाला प्रत्येकी एक सदस्यपद मिळू शकले. विधी समितीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष नगरसेवकाला संधी मिळाली आहे.

महिला व बालकल्याण समिती

चित्रा तांदळे (भाजप), भारती धिवरे (भाजप), स्वाती भामरे (भाजप), कोमल मेहेरोलिया (भाजप), रुपाली निकुळे (भाजप), ज्योती जोंधळे (शिवसेना), इंदुमती नागरे (शिवसेना), प्रमिला मैद (उबाठा), सीमा ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

शहर सुधार समिती

रुपाली स्वप्निल ननावरे (भाजप), उषा हिरामण बैडकोळी (भाजप), श्वेता निर्मल भंडारी (भाजप), जयंत अशोक जाचक (भाजप), संध्या अभिजित कुलकर्णी (भाजप), प्रवीण रमेश जाधव (शिवसेना), प्रमोद बापू पालवे (शिवसेना), योगेश वामन भोर (उबाठा), जागृती दत्तू गांगुर्डे (राष्ट्रवादी काँग्रेस)

वैद्यकीय व सहाय्य समिती

वाळू विश्वनाथ काकड (भाजप), सविता रवींद्र काळे (भाजप), राहुल शांताराम शेलार (भाजप), साधना पवन मटाले (भाजप), सतीश आनंदराव निकम (भाजप), डॉ. पूनम योगेश महाले (शिवसेना), नितीन पंडित दातीर (शिवसेना), वैशाली विनोद दळवी (उबाठा), डॉ. हेमलता निनाद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

विधी समिती

जुई प्रणव शिंदे (भाजप), अंकिता महेंद्र शिंदे (भाजप), विश्वास चिंतामण नागरे (भाजप), राजेंद्र विनायक आहेर (भाजप), भूषण सुरेश राणे (भाजप), कविता अमोल नाईक (शिवसेना), आशा रफिक तडवी (शिवसेना), संजीवनी संजय हंडोरे

शिक्षण समिती

छाया दिलीप देवांग (भाजप), सोनाली तुषार भंदुरे (भाजप), सचिन रमेश मराठे (भाजप), शरद चिंतामण मोरे (भाजप), शरद हरिभाऊ फडोळ (भाजप), नयना नीलेश जाधव (शिवसेना), कैलास सुरेश मुदलियार (शिवसेना), सीमा विशाल पवार (उबाठा), किरण वसंतराव राजवाडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

डॉ. हेमलता पाटील नाराज

आरोग्य समितीवर झालेल्या सदस्य नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील या नाराज असल्याचे सभागृहात दिसून आले. सदस्य नियुक्तीनंतर महापौरांनी समितीतील सर्व सदस्यांना सत्कारासाठी पीठासनावर आमंत्रित केले. परंतु डॉ. पाटील यांनी सदस्य नियुक्तीबद्दलचा हा सत्कार स्वीकारला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT