नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेस 26 कोटी प्रोत्साहन अनुदान; म्युनिसिपल बाँडच्या यशाला केंद्राची दाद

Nashik Municipal Corporation |नाशिक महापालिकेस २६ कोटी प्रोत्साहन अनुदान म्युनिसिपल बाँडच्या यशाला केंद्राची दाद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेने भांडवली बाजारातून २०० कोटी रुपयांचा म्युनिसिपल बाँड यशस्वीपणे उभारल्यानंतर केंद्र सरकारने महापालिकेच्या कामगिरीची दखल घेत २६ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर केले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, ते महाराष्ट्र शासनाच्या अमृत व अमृत २.० मिशनच्या राज्य मिशन संचालकांना पाठवण्यात आले आहेत.

अमृत २.० अभियानांतर्गत स्वतःच्या आर्थिक क्षमतेवर म्युनिसिपल बॉन्डद्वारे निधी उभारणाऱ्या महापालिकांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. त्याच धोरणानुसार नाशिक महापालिकेला २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हा निधी 'स्पर्ध' प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांनुसार या निधीचा खर्च वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करणे बंधनकारक आहे.

तसेच निधीचा वापर ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात आला आहे, त्याच उद्देशासाठी करून त्याची नोंद स्पर्श प्रणालीवर करावी लागणार आहे. खर्च पूर्ण झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र केंद्र सरकारकडे सादर करणेही आवश्यक राहणार आहे.

निधी खर्चावर केंद्राचे लेखापरीक्षण

या अनुदानाच्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे राहणार आहे. या आदेशाची प्रत वेतन व लेखा अधिकारी तसेच नाशिक महापालिका आयुक्त यांनाही पाठवण्यात आली आहे. राज्य शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करून हा निधी वेळेत प्राप्त करण्याच्या सूचनाही केंद्राने दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT