Nashik Municipal Corporation 
नाशिक

Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जीपणा भोवला! नाशिक महापालिकेची पेस्ट कंट्रोल ठेकेदारांवर 25 लाखांची दंडात्मक कारवाई

Nashik Municipal Corporation | धूरफवारणीत हलगर्जी केल्याचा ठपका

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात डेंग्यू, मलेरिया यांसह विविध कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या धूरफवारणीच्या कामात अनियमितता आढळल्याने पेस्ट कंट्रोलच्या दोन ठेकेदारांवर गेल्या तीन वर्षांत तब्बल २५ लाख २ हजार ८३२ रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

डेंग्यू, मलेरिया तसेच इतर कीटकजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेने औषध व धूरफवारणीच्या कामासाठी मे. दिग्विजय एंटरप्रायजेस, नाशिक आणि एस अँड आर पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस, नाशिक या दोन ठेकेदारांची नियुक्ती केली आहे.

निविदेतील अटी व शर्तीनुसार फवारणीचे काम करणे ठेकेदारांना बंधनकारक आहे. मात्र, तपासणीदरम्यान नियमांचे पालन होत नसल्याचे आढळल्याने महापालिकेने वेळोवेळी दंडात्मक कारवाई केली आहे. मे. दिग्विजय एंटरप्रायजेसकडे नाशिक पूर्व, नाशिकरोड आणि पंचवटी या तीन विभागांतील धूरफवारणीची जबाबदारी आहे.

१ ऑगस्ट २०२३ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत या ठेकेदाराच्या कामात विविध अनियमितता आढळली. त्यासाठी मलेरिया विभागाने ठेकेदाराला २० लाख १३ हजार ८३२ रुपयांचा दंड ठोठावला. तर एस अँड आर पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसकडे नवीन नाशिक आणि सातपूर या दोन विभागांची जबाबदारी आहे.

जून २०२५ ते मे २०२६ या कालावधीत झालेल्या कामाच्या तपासणीत कामगार वेळेवर न पोहोचणे, जीपीएस लोकेशन ट्रेस न होणे आणि नियोजित वेळापत्रकानुसार फवारणी न करणे यांसारख्या त्रुटी आढळल्या. त्यानुसार संबंधित ठेकेदारावर ४ लाख ८९ हजार रुपयांचा दंड केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT