नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना वाढत्या उपनगरांतील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. केंद्रपुरस्कृत 'अर्बन चॅलेंज फंड' (यूसीएफ) अंतर्गत शहरातील विविध भागांत सहा नवीन उच्चस्तरीय जलकुंभ, जलवाहिण्या आणि संबंधित कामे हाती घेण्यात येणार आहेत.
त्यासाठी तब्बल २८ कोटी १४ लाख ९८ हजार ७०७ रुपयांच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या यूसीएफ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील तीन प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठी केंद्राकडून ४९७.३७ कोटी रुपयांचा साहायता निधी उपलब्ध झाला आहे.
त्यातील नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या प्रकल्पालाही मान्यता मिळाली आहे. मुकणे धरण योजनेतील विल्होळी येथील २७४ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पासह शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन आहे.
प्रस्तावित जलकुंभांची प्रत्येकी २० लाख लिटर क्षमता असून, त्यांची स्टेजिंग हाइट २० मीटर राहणार आहे. सातपूर, नवीन नाशिक, पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिकरोड आणि नाशिक पश्चिम या विभागांतील विविध ठिकाणी ही कामे प्रस्तावित आहेत.
महापालिका हद्दीतील बाह्य भागात वाढणारी नागरी वस्ती आणि भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. सन २०५५ पर्यंतची संभाव्य लोकसंख्या गृहीत धरून पाणीपुरवठा यंत्रणेची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न या प्रस्तावातून करण्यात आला आहे.
विभागठिकाण / परिसरप्रकल्पाचे स्वरूपसातपूरपिंपळगाव बहुला शिवार२० लाख लिटर जलकुंभ व वाहिन्या नवीन नाशिकपाथर्डी शिवार२० लाख लिटर जलकुंभ व वाहिन्या पंचवटीहिरावाडी, शक्तीनगर२० लाख लिटर जलकुंभ व वितरण पाइपलाइन नाशिक पूर्वनाशिक शिवार२० लाख लिटर जलकुंभ व वितरण वाहिन्या नाशिकरोडदेवळाली शिवार, दुर्गा उद्यान२० लाख लिटर जलकुंभ व वाहिन्या नाशिक पश्चिममहात्मा नगर२० लाख लिटर जलकुंभ सातपूर (अतिरिक्त काम)सुला चौक ते आशीर्वाद नगरईएसआरसाठी फीडिंग पाइपलाइन