Nashik Municipal Corporation 
नाशिक

Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी तब्बल 1618 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीला मिळणार मुहूर्त

Nashik Municipal Corporation | 1618 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मानधनावर भरतीसाठी आठवडाभरात जाहिरात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागासाठी १ हजार ६१८ वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळाची मानधनावर भरती करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी सुरू असून, येत्या आठवड्यात यासंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता सूत्रान व्यक्त केली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. या कालावधीत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव, साथरोग, अपघात तसेच विविध आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेच्या विद्यमान रुग्णालयातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासह नवीन रुग्णालये कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

२०.२४ कोटींचा खर्च

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून मनपाच्या विकासकामांसाठी मंजूर निधीत सार्वजनिक आरोग्य विभागासाठी २० कोटी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच निधीतून मानधनावरील अतिरिक्त मनुष्यबळाच्या नियुक्तीचा खर्च भागवण्यात येणार आहे. कुंभमेळ्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णसेवा, साथरोग नियंत्रण, आरोग्य सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रमुख ठिकाणी आणि गोदाघाट परिसरात तात्पुरती रुग्णालये, आरोग्य केंद्र आणि अतिदक्षता विभाग उभारण्याची तयारी करण्यात येत आहे. या संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या संचालनासाठी सध्याचे मनुष्यबळ अपुरे पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मानधनावर नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मनपाच्या महासभेने मंजुरी दिली आहे.

या मानधनावरील भरतीचा ठराव प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रियेची संचिका प्रशासकीय पातळीवर अंतिम टप्प्यात असून, त्यावर आयुक्तांची स्वाक्षरी होताच आठवडाभरात भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागातील सूत्रानी दिली आहे.

४६९ डॉक्टर्स, ३९८ परिचारिका भरती

महासभेने मंजुरी दिल्यामानुसार, मनпаच्या वैद्यकीय विभागासाठी १२७ विशेषज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, १४१ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, २०१ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी अशाप्रकारे ४६९ डॉक्टर्स, २३३ स्टाफ नर्स, १६५ एएनएम, १९८ औषध निर्माण अधिकारी आणि ५५३ सहायक कर्मचारी, असे एकूण १६१८ कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती केली जाणार आहे. पैकी १५४ कर्मचाऱ्यांची तीन महिन्यांसाठी, ५६४ कर्मचाऱ्यांची चार महिन्यांसाठी अनुबंधी पद्धतीने अथवा मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT