Monsoon weather Pudhari Photo
नाशिक

Monsoon Task Force | महापालिकेचा 'मान्सून टास्क फोर्स' सज्ज

Monsoon Task Force | या उपक्रमांतर्गत शहरातील सहा विभागांसाठी सहा स्वतंत्र विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्यात शहरातील नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच स्थानिक पातळीवरील समस्या तातडीने सोडवल्या जाव्यात यासाठी नाशिक महापालिकेने यंदा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या थेट समन्वयातून विशेष 'मान्सून टास्क फोर्स' कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत शहरातील सहा विभागांसाठी सहा स्वतंत्र विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहे. शुक्रवारपासून (दि. २६) प्रभागनिहाय विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. नालेसफाई, गटारांची साफसफाई, पाणीपुरवठ्यातील अडचणी, पाइपलाइन गळती, रस्त्यांवरील खड्डे, पाणी साचणारी ठिकाणे, धोकादायक झाडांच्या फांद्या तसेच इतर पावसाळी समस्यांवर ही पथके तातडीने उपाययोजना करतील.

नागरिकांकडून नगरसेवकांकडे येणाऱ्या तक्रारी थेट पथकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून, त्यानुसार आवश्यक कामे तातडीने हाती घेतली जाणार आहेत. प्रत्येक पथकात सुमारे १५ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक मनुष्यबळ, जेसीबी, टिप्पर, क्रेनसह आवश्यक यंत्रसामग्रीचा समावेश असेल. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.

सहा विभागांसाठी स्वतंत्र समन्वयक

या मोहिमेसाठी पंचवटी, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिकरोड, नवीन नाशिक आणि सातपूर विभागांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित विभागातील नागरिकांच्या समस्या आणि कामांच्या अंमलबजावणीवर हे अधिकारी देखरेख ठेवणार आहेत.

पावसाळ्यात समस्या निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्या निर्माणच होऊ ● पावसाळ्यात साहस्या निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्या निर्माणच होऊन यंत्रणेच्या संयुक्त समन्वयातून प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष कामे केली जातील. नागरिकांनी त्यांच्या परिसरातील समस्या संबंधित नगरसेवकांकडे कळवाव्यात. त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल.
- मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT