नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत सदस्यांनी सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला. गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीतील विकास-कामांचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी नगरसेवकांच्या प्रभाग विकास निधीत भरीव वाढ करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली.
आयुक्त मनीषा खत्री यांनी सादर केलेल्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या प्रारूप अंदाजपत्रकावर चर्चेसाठी सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली स्थायीची विशेष सभा शुक्रवारी (दि.६) पार पडली.
राहुल दिवे यांनी गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी अंदाजपत्रकात झालेली घट, बीओटी प्रकल्प, शिक्षण विभागासाठी करण्यात आलेली वाढीव तरतूद या संदर्भात प्रश्न उपस्थित करत उत्पन्नवाढीसाठी वाणिज्य आस्थापना-वर करवाढ करण्याची सूचना मांडली.
रंजना बोराडे यांनी दसक पंचक, नांदूर-मानूर खेडे विकासासाठी तसेच दसक घाट ते मलनिःसारण केंद्रापर्यंत डीपी रस्ता विकसित करण्याची मागणी केली. माधुरी बोलकर यांनी सातपूर विभागातील अशोकनगर जलकुंभात मृत कबूतर पडल्याने आरोग्य धोक्यात आल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
मयूरी पवार यांनी काझी गढीच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न मांडला. योगेश गाडेकर यांनी मिळकतींच्या कर आकारणीची पुनर्पडताळणी करण्याची, भाडेतत्त्वावर दिलेल्या मनपा मिळकतींची भाडे वाढीची सूचना मांडली. सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, इंदुबाई खेताडे व पल्लवी गणोरे, अनिता पांडे, मुकेश शहाणे यांनी
श्वेतपत्रिका जाहीर करा
प्रशासकीय राजवटीतील कामांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आल्यानंतर स्थायी समितीच्या सभेतही त्याचे पडसाद उमटले. प्रशासकीय राजवटीतील कामांची आर्थिक श्वेतपत्रिका स्थायी समितीच्या पुढील सभेत सादर करण्याची आग्रही मागणी भारती ताजनपुरे यांनी केली.