नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतरासाठी दबाव, गोमांस भक्षणाची सक्ती आणि नमाजपठणाचे जे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामागील विखारी जिहादी मानसिकता आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
निवेदनात म्हटले की, हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून मुंबईसह देशातील इतर शाखांमध्ये पसरलेले मोठे कॉर्पोरेट जिहाद असू शकते. यामागील लव्ह जिहाद, धार्मिक दहशत आणि धर्मांतर रॅकेटचा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने दिला आहे. निवेदनाच्या प्रति नाशिकचे पोलिस आयुक्त यांच्यासह निफाड, येवला, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.