Nashik Police Commissioner Sandeep Karnik / नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक Pudhari News Network
नाशिक

Nashik MNC Case SIT | नाशिक MNC कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडमध्ये, 'एसआयटी' स्थापन

Nashik MNC Case SIT | नाशिक MNC कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ॲक्शन मोडमध्ये, 'एसआयटी' स्थापन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील बहुराष्ट्रीय कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाचे गांभीर्य लैंगिक शोषण लक्षात घेता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यांची व्याप्ती, संवेदनशीलता आणि वाढती गंभीरता पाहता तपास अधिक प्रभावी आणि सखोल करण्यासाठी हे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यासह मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणात एकूण ९ गुन्ह्यांचा तपास या विशेष पथकाकडे सोपवण्यात आला आहे. याशिवाय भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचाही तपास याच पथकाद्वारे करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या विशेष तपास पथकाच्या प्रमुखपदी सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली १२ अधिकारी व कर्मचारी तपासाची जबाबदारी सांभाळत आहेत.

पथकात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, मुंबईनाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक गौतम सुरवाडे, सुधीर पाटील, कल्पेश दाभाडे, जितेंद्र वाघ, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे उमेश बोरसे यांचा समावेश आहे.

याशिवाय विशेष शाखेचे पोलिस उपनिरीक्षक भाईदास माळी, उपनगर पोलिस ठाण्याचे किरण शेवाळे, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या मिताली कोळी, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे हवालदार संदीप बागल यांचा या पथकात समावेश आहे. तपास पथकप्रमुखांनी या गुन्ह्यांच्या तपासाचा नियमित प्रगती अहवाल पोलिस आयुक्तांना सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पीडित महिलांसाठी हेल्पलाइन

नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी पीडित महिलांसाठी ९१२३२३२३११ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. आपत्कालीन मदतीसाठी ११२ कंट्रोल रूमवरही संपर्क साधता येणार आहे.

तक्रारदारांची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार आहे. सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. सर्व खासगी संस्थांना महिला सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपींना लवकरच सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT