Ashok Kharat Case | जमीन खरेदीसाठी उद्योजकांकडून खरातच्या खात्यांत 4 कोटी

शिर्डी, नाशिक, मुंबईतून केले आरटीजीएस; नॅशनल बँकांमध्ये दोन वर्षात 20 कोटी डिपॉझिट
Ashok Kharat Case|
Ashok Kharat Case | जमीन खरेदीसाठी उद्योजकांकडून खरातच्या खात्यांत 4 कोटीFile Photo
Published on
Updated on

अहिल्यानगर : भोंदू अशोक खरातचे तपासी यंत्रणेला चक्रावून टाकणारे अघोरी कारनामे समोर येत आहे. शिर्डीत चार एकर जमीन खरेदीसाठी खरातच्या खात्यात उद्योजकांनी चार कोटी आरटीजीएसद्वारे वर्ग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान भोंदू खरातच्या युनियन आणि बडोदा बँकेतील खात्यात दोन वर्षात 20 कोटीचे डिपॉझिट झाल्याचेही समोर आले.

रावसाहेब गोंदकर यांची शिर्डीतील चार एकर जमीन भोंदू खरातने 2023 मध्ये खरेदी केली. 50 कोटींचे बाजारमुल्य असलेली ही जमीन भोंदू खरातने अवघ्या पाच कोटीत हडपली आहे.

33 खातेदारांची फसवणूक

भोंदू खरात नॉमिनी असलेल्या समता पतसंस्थेतील 33 खातेधारकांच्या 60 खात्यांची तपासणी करण्यात आली. या खातेधारकांनी आर्थिक व्यवहाराची माहिती नसल्याचे जबाब दिले आहेत.

बोगस इन्कम टॅक्सची रेड

मोठ्या व्यावसायिकांची माहिती काढून भोंदू खरात स्वत:च्या यंत्रणेमार्फत इन्कम टॅक्सची धाड टाकण्याचे ‘नवा उद्योग’ करत होता. धाड टाकणारे तोतया अधिकारी हे खरातचेच पंटर असत.

आयएएस महिला अधिकार्‍याचे कनेक्शन

नाशिक : भोंदू अशोक खरात याच्याशी आयएएस महिला अधिकार्‍याचे कनेक्शन समोर आल्यानंतर संबंधित अधिकार्‍याची एक-एक माहिती समोर येऊ लागली आहे. संबंधित महिला अधिकारी आठवड्यातून तीनवेळा सिन्नरच्या दौर्‍यावर जात होत्या. सुरुवातीला अन्य अधिकार्‍यांना सोबत घेणार्‍या या अधिकारी नंतर मात्र एकट्याच खासगी वाहनाने या भागात जात असल्याची चर्चा आहे.

भोंदू अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

नाशिक : नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणीत खरातला दुसर्‍या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने यापूर्वी खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news