नाशिक

नाशिक : सभासदांचे हित हेच प्रगती पॅनलचे हित ; नवनिर्वाचित संचालक महेंद्र बुरड 

गणेश सोनवणे

देवळा  ;  सहकार क्षेत्रात अग्रगण्य अशा नामको बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने निवडणूक दिले. यापुढेही आम्ही सर्व संचालक मंडळ बँकेच्या प्रगतिसाठी परिश्रम घेऊन सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून कामकाज करणार असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित संचालक महेंद्र बुरड यांनी आज येथे केले.

नामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून यात प्रगती पॅनल चे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडणूक आले. यात सटाणा देवळा तालुक्यातील विजयी उमेदवार महेंद्र बुरड यांचा देवळा तालुक्यातील सभासदांनी सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी  बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाऊसाहेब पगार, शेतकरी संघाचे अध्यक्ष कैलास देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील आहेर, सुराणा पतसंस्थेचे संस्थापक माजी उपाध्यक्ष अशोक सुराणा, शरदराव पवार पतसंस्थेचे व्हा. चेअरमन हिरामण आहेर, कीर्तन केसरी ह भ प संजय धोंडगे, मेतकर पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मेतकर, नगरसेवक संतोष शिंदे, दोस्ती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ पुरकर, दिलीप आहेर, डॉ. किरण आहेर, संजय गायकवाड, जयेश संकलेचा, अनिल आहेर, सचिन सुर्यवंशी, राजेंद्र आहेर, बाळासाहेब गुंजाळ, अतुल आहेर, संभाजी शेजवळ, साहेबराव आहेर, गोरख आहेर, कपिल अहिरराव, दादाजी आहेर, मयूर आहेर, आबा शेवाळकर कर्मचारी आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT