नाशिक : राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची व्याप्ती वाढवून यापूर्वीच्या २०१७ आणि २०१९ च्या योजनेतील वंचित शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील दोन लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या ३० ते ३१ हजार खातेदारांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. यातून जिल्हा बँकेला वाढीव अंदाजे २५० कोटी रुपये मिळू शकतात.
गत आठवड्यात राज्य शासनाने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. १ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०२५ मधील थकबाकीदार पात्र शासन निर्णयानुसार, १ जुलै २०१९ ते ३० सप्टेंबर २०२५ या ६ वर्षांच्या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचे लाभार्थी म्हणून गृहित धरण्यात आले आहे. जिल्हा बँकेने या विहित कालावधीत जिल्ह्यातील सुमारे २५ हजार शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. यातच, यापूर्वी झालेल्या दोन्ही कर्जमाफी योजनेचा फायदा न मिळालेल्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावी, अशी मागणी होती.
या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वाढत्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापूर्वी कर्जमाफी दिलेल्या मात्र, यात वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे नाशिक जिल्हा बँकेला फायदा मिळ शकतो.
सन २०१७ मध्ये जिल्ह बँकेला सर्वाधिक १७५० कोटींचे कज वाटप केलेले आहे. यानंतर लाग झालेली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना फडणवीस सरकारने जाहीर केली. यात अनेक शेतकऱ्यांच कर्जमाफी झाली. परंतु, द्राक्ष, डाळिंब यांचे उत्पादन घेणाऱ्या सर्वाधिक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले होते. त्यावेळी असलेल्या अटी आणि निकष यांचाही मोठा फटका त्यावेळी शेतकऱ्यांना बसला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमार्फ योजनेतही शेतकर कर्जमाफीपासून वंचित राहिले होते शिवाय त्यावेळीही या योजनेतही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच संख्या ही मोठी आहे. शासनाने या वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या घेतलेल्य निर्णयामुळे जिल्हा बँकेत या कर्जदारांच संख्या ही ३० ते ३१ हजार आहे. य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
जिल्हा बँकेत माहिती काढण्याचे काम सुरू
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्हा बँकेच्या कार्यालयात माहिती काढण्याचे काम सुरू झाले आहे. यावेळी ऑडिट कामकाजाची पाहणी करण्यात येत आहे. यावेळी विभागीय सहनिबंधक संभाजी निकम, प्रभारी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, विशेष लेखापरीक्षक अधिकारी बर्वे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे, बँकेचे सरव्यवस्थापक हिरे, बँकेचे कर्जवसुली विभागाचे व्यवस्थापक वाटपाडे, नाशिक विभागीय अधिकारी मेतकर व निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी आदी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.