Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela 2026 | सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा 11 जूनला

Nashik Simhastha Kumbh Mela 2026 | हा सोहळा जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते तसेच कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ, पंचवटी येथे गुरुवारी (दि.११) सकाळी ८ वाजता ध्वजस्तंभशिलान्यास पूजन सोहळ्याचे आयोजन गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी व प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा सोहळा जगद्‌गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते तसेच कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्याला दिगंबर आखाड्याचे महंत वैष्णवदास, महंत माधवदास, निर्वाणी आखाड्याचे महंत मुरलीधर दास, महंत मोहनदास, निर्मोही आखाड्याचे महंत राजेंद्रदास, महंत रामजीदास, मंगल पीठाधीश्वर माधवाचार्य, महंत भक्तिदास, रामकिशोरदास शास्त्री, महंत रामस्नेहीदास याशिवाय वैष्णव आखाड्यांचे सर्व संत-महंत, महामंडलेश्वर, विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक आमदार, महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधी या सोहळ्यास प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या ऐतिहासिक सोहळ्यास नाशिकमधील सर्व धर्मप्रेमी नागरिक, भाविक भक्तगण तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला आखाड परिषदेचे प्रवक्ते महंत डॉ. भक्तिचरणदास तसेच नाणीज धामचे व्यवस्थापक प्रवीण ठाकूर पुरोहित संघाचे उपाध्यक्ष दिलीप शुक्ल विश्वस्त वैभव दीक्षित, शेखर शुक्ल, प्रतीक शुक्ल आदी मान्यवर उपस्थित होते.

आकर्षणाचा केंद्रबिंदू या ध्वजस्तंभ

शिलान्यास पूजनामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक कार्यांना विधिवत प्रारंभ होणार आहे. वैदिक मंत्रोच्चार, संत-महंतांचे आशीर्वाद आणि धर्मपरंपरेच्या साक्षीने होणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT