नाशिक

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी २८५ कोटींचे २१ नवे पुल उभारण्याची तयारी

गणेश सोनवणे

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी महापालिकेने सुरू केली असून प्रारूप सिंहस्थ आराखडा अंतिम केला जात आहे. सिंहस्थकाळात शहरात वाढणारी गर्दी लक्षात घेता अस्तित्वातील पुलांचे सक्षमीकरण करतानाच तब्बल २८५ कोटींचे २१ नवे पुल उभारण्याची तयारी महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत केली जात आहे.

संबधित बातमी :

२०२७-२८  मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशांनुसार महापालिकेने प्रारूप सिंहस्थ आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांना निर्देश दिले असून प्रारूप प्रस्ताव सिंहस्थ आराखडा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना सादर करण्यात येत आहेत. येत्या महिनाभरात प्रारूप सिंहस्थ आराखडा तयार करून अंतिम आराखड्यासाठी सल्लागाराची नियुक्ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सिंहस्थकाळात येणाऱ्या साधु-महंत व कोट्यवधी भाविकांना मुलभूत सेवा-सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असणार आहे. त्यादृष्टीने बांधकाम विभागाला महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. पाणीपुरवठा, आरोग्य-वैद्यकीय, मलनिस्सारण विभागाप्रमाणेच बांधकाम विभागाने आपला प्रारूप प्रस्ताव आयुक्तांना सादर केला आहे. या प्रस्तावानुसार शहरात २१ ठिकाणी २८५ कोटींचे पुल उभारण्यात येणार आहेत. याअंतर्गत अस्तित्वातील पुलांचे रुंदीकरण तर काही ठिकाणी नवीन पुल उभारले जाणार आहेत. यात गोदावरी नदीवर ९ ठिकाणी, वालदेवीवर १, नंदीनीवर सात, वाघाडी-अरुणावर चार पुल प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे.

याठिकाणी उभारणार पुल

गोदावरी नदीवर दसकगाव, तपोवन एसटीपी, लक्ष्मीनारायण मंदिरालगत, टाळकुटेश्वर, गाडगे महाराज, रामसेतू पादचारी पुल, रामवाडी पूल, कुसुमाग्रज उद्यानालगत तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या नर्सरीलगत नवीन पुल उभारला जाणार आहे. याशिवाय नंदीनी नदीवर पखालरोड, भारतनगर, चिल्ड्रेनपार्क, मिलिंदनगर १, मिलिंदनगर २, सिटी सेंटर मॉल, दोंदे पुल येथील अस्तित्वातील पुलाच्या ठिकाणी नवीन पुल उभारले जातील. वाघाडी-अरुण नदीवर गुंजाळबाबा नगर, राजमाता, पोकार कॉलनी, म्हसरूळ गाव येथे तर वालदेवी नदीवर वडनेर येथे पुल उभारला जाणार आहे. यासाठी २८५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT