शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी Shiv Sena Thackeray group district chief D. G. Suryavanshi
नाशिक

Nashik Kumbh Mela and Induction Ceremony BJP | सिंहस्थ निधीच्या लुटीसाठी बडगुजर, घोलप भाजपमध्ये

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सिंहस्थ निधीच्या लुटीसाठी सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप भाजपमध्ये जात आहेत. केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठीच भाजप आणि शिवसेना शिंदे गटात आमचे काही माजी नगरसेवक व पदाधिकारी जात आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी केला आहे.

शिवसेना(उबाठा)चे माजी उपनेते बडगुजर, माजी मंत्री घोलप या बड्या नेत्यांसह काही माजी नगरसेवकांनी उबाठाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटातही उबाठाच्या काही माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. त्यामुळे उबाठाला मोठा धक्का बसला आहे. यासंदर्भात जिल्हाप्रमुख सूर्यवंशी यांनी, भाजपला गैरमार्गाने नाशिकमध्ये सत्ता आणायची असल्यामुळेच प्रवेश सोहळे सुरू असून, शहर लुटण्यासाठी अन्य पक्षांतील नेते फोडून आपल्या पक्षात आणले जात आहेत, असा आरोप केला.

Nashik Latest News

नाशिक शहराची सध्याची स्थिती बिकट आहे. रस्ते,पाणी प्रश्न कायम असताना नेते मात्र आपल्या स्वार्थाचा विचार करत असल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला. भाजपमध्ये प्रवेश करणारे बडगुजर कुटुंब सोडले तर कोणीही मोठे नाही. उर्वरित हे २००७ आणि २०१२ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले माजी नगरसेवक आहे. माजी शब्द लावल्यानंतर आजकाल कोणीही नगरसेवक होतात असा टोला त्यांनी लगावला. काहीजण पक्ष सोडताना खोटे आरोप करतात. भाजप, शिवसेना शिंदे गटाकडून अडीच वर्षांपासून तोडफोड सुरू आहे. पैसे घ्यायचे तिकडे जायचे एवढच काम सध्या सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्या पक्षातील लोकांना प्रवेश दिल्यामुळे भाजप, शिंदे गटाचेही काही माजी नगरसेवक नाराज असून, ते आमच्या संपर्कात आहेत आहे. भाजपमध्येही अनेक लोक नाराज असून, भाजपचाही फुगा फुटेल असा दावा त्यांनी केला

विलास शिंदे आमच्यासोबतच

बडगुजर, घोलपसह डझनभर नेत्यांनी उबाठाला सोडचिठ्ठी दिली असली तरी, महानगरप्रमुख विलास शिंदे नाराज नसल्याचा दावा सूर्यवंशी यांनी केला आहे. शिंदेंनी संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. पक्षाचे काम ते जोमाने करत आहेत. शिंदे आमच्या सोबतच आहेत, असा दावाही सूर्यवंशी यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT