न्यायालय  Pudhari File Photo
नाशिक

Nashik | कळमुस्ते खून प्रकरणात आरोपीला जन्मठेप

नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

घोटी : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खून जोशीवाडी येथील प्रकरणातील आरोपीला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. घोटी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल खटल्याची सुनावणी गुरुवारी (दि. २३) जिल्हा न्यायाधीश श्रीमती पांढरे यांच्या न्यायालयात पूर्ण होऊन आरोपी किसन महाद् पारधी (४०, रा. कळमुस्ते, जांबुळवाडी, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) याला दोषी ठरविण्यात आले.

आरोपीला न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत आजन्म कारावास व १० हजार रुपये दंड तसेच कलम ३०७ अंतर्गतही आजन्म कारावास व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही घटना २२ मे २०२२ रोजी सकाळी ९.४५ वाजता घोटी पोलिस ठाणे हद्दीतील जोशीवाडी येथे घडली होती.

पत्नी इंदुबाई पारधी ही सासरी नांदण्यास येत नसल्याच्या कारणातून आरोपीने बाद निर्माण केला होता. त्यानंतर भांडण सोडवण्यास आलेल्या COURT माधुरी पारधी हिला विळ्याने हल्ला करून जखमी केले व तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता तसेच कमळाबाई भुतांबरे या महिलेला कात्रीने भोसकून ठार मारले होते. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधास यांनी करून आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेटकर यांनी खटल्यात प्रभावी युक्तिवाद केला, पैरवी अंमलदार वैशाली भोर यांनीही महत्वाची भूमिका बजावली. तसेच दोषसिद्धी विभागाचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील व महिला पोलिस अंमलदार अश्विनी परदेशी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून पाठपुरावा केला. या गुन्ह्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT