नाशिक : खैरगाव येथे जलसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीच्या लोकार्पणप्रसंगी मान्यवर. Pudhari News Network
नाशिक

Nashik Jalasamrudhi project | जलसमृद्धीमधून पाणीटंचाईवर मात

Nashik Water Shortage : खैरगाव (ता. इगतपुरी) येथे जलसमृद्धी प्रकल्पातून पाण्यासाठीची पायपीट थांबली

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : खैरगाव (ता. इगतपुरी) येथे राबविण्यात आलेल्या जलसमृद्धी प्रकल्पातून दीर्घकाळापासून सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यात आली आहे. यामुळे उन्हाळ्यात महिलांची पाण्यासाठी होणारी दीड-दोन किलोमीटरची पायपीट थांबणार आहे.

खैरगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या असून, महिलांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती. मात्र, जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत महिंद्रा आणि यश फाउंडेशनने गावात २.६६ लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेली ३० फुटांची विहीर बांधल्याने गावकऱ्यांच्या पिण्याची समस्या सुटली आहे. या विहिरीचे लोकार्पण महिंद्राचे अधिकारी राजेश खानोलकर, सयाजी जाधव, यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT