'अल्पवयीन मुस्लिम तरुणी विवाह  
नाशिक

Nashik IT Company Forced Conversion | मुख्य संशयित निदा खान अजूनही फरार! नाशिक पोलिसांकडून शोध सुरू; तपासाची व्याप्ती वाढली

Nashik IT Company Forced Conversion | बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला कर्मचारी लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित आरोपी अश्विनी चैनानी तिच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून, तिला १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिला कर्मचारी लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित आरोपी अश्विनी चैनानी तिच्या कोठडीत वाढ करण्यात आली असून, तिला १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे, सदर प्रकरण हे अतिशय संवेदनशील आहे. या प्रकरणामधील प्रमुख संशयित निदा खान अजूनही फरार आहे. जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा संदर्भ आहे.

त्यामुळे या प्रकरणाची जास्त चर्चा झाली आहे. सदर प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे तपासासाठी संशयित आरोपीला ७ दिवस कोठडी मिळावी, अशी मागणी तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक गौतम सुरवडे यांनी केली.

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायधीश जे. व्ही. पालीवाल यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. सरकारी पक्षाकडून सहायक संचालक तथा अधिवक्ता कल्पना बेंडभर व संशयित आरोपीकडून वी आर देशपांडे यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, या प्रकरणातील निदा खान ही प्रमुख संशयित आरोपी अजूनही फरार आहे. तिचा शोध पोलिस घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT