Nexus: The Next Wave of Innovation
नाशिक : नाशिक एंटरप्रेन्योर फोरमतर्फे आयोजित वार्षिक एकदिवसीय प्रतिष्ठित उद्योजक संमेलनाचे आयोजन शनिवार, दि. १० जानेवारी रोजी हॉटेल एक्स्प्रेस इन येथे होत आहे. यंदाची संकल्पना ‘नेक्सस: नेक्स्ट वेव्ह ऑफ इनोव्हेशन’ची अशी आहे.
उद्योजक संजय लोढा आणि अजय बोहरा यांच्या नेतृत्वाखाली एनईएफ नाशिकला नाविन्यपूर्ण उद्योगांचे केंद्र म्हणून पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असल्याची माहिती उद्योजक संजय लोढा यांनी दिली. उद्योजकांना व्यवसायवृद्धीचे नवे मार्ग शोधण्यासाठी मदत करणे, उद्योग जगतामध्ये शाश्वतता व नवकल्पनांना चालना देणे हा आहे.
देश- विदेशातील तज्ज्ञ उद्योजक व उद्योगनेते या व्यासपीठावर त्यांच्या अनुभवांद्वारे व्यवसायातील आव्हाने, बाजारातील ट्रेंड आणि यशस्वी मॉडेल्स याबद्दल मार्गदर्शन करणे हा या संमेलनाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून संजय घोडावत ग्रुपचे संस्थापक संजय घोडावत, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्रिंसिपल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स मुंबईचे डॉ. पल्लवी दराडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, फायनान्स बाय संजयचे संस्थापक संजय कथुरिया, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता डॉ. हर्ष सुराणा यांची उपस्थिती राहणार आहे.
‘स्टार्ट-अप टँक’ : ऑन-द-स्पॉट फंडिंगची संधी
यावर्षी कार्यक्रमात विशेष ‘स्टार्ट-अप टँक’ सत्र ठेवण्यात आले आहे. पात्र स्टार्ट-अप्सना गुंतवणूकदारांकडून त्वरित निधी मिळण्याची संधी यात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नाशिकमधील उद्योजकतेला नवीन गती मिळण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमास दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, एक्सप्रेस इन, पिंक फार्मसी, नाहर डेव्हलपर्स, एम. बी. शुगर, निवेदिता मॅटर्निटी होम आणि बेस्ट एस.एम.एस. यांचे सौजन्य लाभले आहे. सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक असून त्यासाठी india-entrepreneurs.com किंवा 9850969781 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.