Liquor Pudhari
नाशिक

Nashik Illegal Liquor-नाशिकमध्ये हातभट्टी दारूविरोधात धडक मोहीम

पुणे दुर्घटनेचा बोध : १२ दिवसांत ९५ गुन्हे, ७२ आरोपी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुणे जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या मिथेनॉल मिश्रित विषारी हातभट्टी दारूमुळे झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायांविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

नाशिकचे अधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान केवळ १२ दिवसांत २५ गुन्हे नोंदवले असून, ७२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ४१ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय ५९ हजार ४३० लिटर घातक रसायन आणि २ हजार ५४९ लिटर हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना हातभट्टी अथवा गावठी दारूचे सेवन न करण्याचे आवाहन केले आहे.

अशा प्रकारची दारू रासायनिक भेसळयुक्त असण्याची शक्यता असून, ती आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि जीवघेणी ठरू शकते, असा इशाराही विभागाने दिला आहे. दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही अवैध दारूनिर्मिती, साठा, विक्री किंवा वाहतूक होत असल्याचे आढळल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे.

अवैध दारूनिर्मिती, विक्री किंवा वाहतूक हा गुन्हा असून, याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तत्काळ टोल फ्री क्रमांक : १८००२३३९९९९ व्हॉट्सअप : ८४२२००११३३ दूरध्वनी : ०२५३-२३१९७४४ अवैध मद्यविक्रीविरोधात पुढील काळातही कारवाया सुरू राहणार आहेत.

- संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT