Kalpana Kharat Bail Application Rejected  file photo
नाशिक

Kalpana Kharat Bail Application Rejected | कल्पना खरातचा जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळला

Kalpana Kharat Bail Application Rejected | दोन महिन्यांपासून फरार; अटकेचा मार्ग मोकळा झाला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी कल्पना खरात यांचा जामीन अर्ज छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने देखील फेटाळला आहे. यापूर्वीही राहाता न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे तपास यंत्रणांना मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, कल्पना खरात या गेल्या तीन महिन्यांपासून फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.

त्यांच्यावर तीन कोटी रुपये व्याजाने दिल्याचा आरोप असून, या व्यवहारांशी संबंधित आर्थिक पुरावे आणि कागदपत्रांची छाननी सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेला भोंदू अशोक खरात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कल्पना खरात यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळण्यात आल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे तपास अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास मदत होणार असल्याचे कायदेविषयक जाणकारांचे मत आहे. फरार आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली असून, या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रकरणातील पुढील घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT