Former corporator Uddhav Nimse, the accused in the Rahul Dhotre murder case.
नाशिक: राहुल धोत्रे हत्याकांडातील आरोपी माजी नगरसेवक उद्धव निमसे याच्या जामिनावर बुधवारी नव्याने सुनावणी होणार आहे. धोत्रे कुटुंबाने न्यायालयात तीव्र आक्षेप घेतल्यानंतर यावरील सुनावणी २३ रोजी एक दिवस पुढे ढकलली.
ऐनवेळी बेंच उपलब्ध न झाल्यामुळे सुनावणी नव्याने दुसऱ्या बेंचवर होणार आहे. त्यामुळे जामिनावर काय निर्णय होतो, याकडे धोत्रे व निमसे कुटुंबियांचे लक्ष लागून आहे. कारण मंगळवार, दि. ३० डिसेंबर ही मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.
त्यामुळे उद्धव निमसेला निवडणूक लढवता येणार की नाही, हे जामीन अर्जावर होणाऱ्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे निमसे व धोत्रे कुटुंबाच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. या अगोदर सत्र व उच्च न्यायालयाने उद्धव निमसेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. राहुल धोत्रे हत्याकांडाचे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर निमसे यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. उद्धव निमसे हा १६ सप्टेंबरपासून कारागृहात बंदिस्त आहे.