

नाशिक: राहुल धोत्रे हत्याकांडातील आरोपी माजी नगरसेवक उद्धव निमसेने सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असून त्या अर्जावर १७ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
मनपा निवडणूक आता घोषित झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जामीन अर्जावर काय निर्णय होतो, याकडे निमसे कुटुंबाचे लक्ष आहे. जर अर्ज फेटाळला तर निवडणूक उद्धव निमसेना लढवता येणार नाही. या अगोदर सत्र व उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोप पत्र दाखल झाल्यानंतर पुन्हा नव्याने जामिनासाठी अर्ज केला आहे. निमसे हा १६ सप्टेंबर पासून कारागृहात बंदिस्त आहे. २३ ऑगस्ट रोजी नांदूर नाका येथे दोन गटांमध्ये किरकोळ भांडणाचे रूपांतर गंभीर हाणामारी झाली.राहुल धोत्रे या तरुणाचा खून झाला. त्याप्रकरणी निमसे कारागृहात आहेत.