देवळाली कॅम्प लहवित एअरपोर्टच्या सुरक्षा भिंतीवर आरामात बसलेली बिबट्याची मादी. दुसऱ्या छायाचित्रात मुक्तसंचार करणारे बछडे. 
नाशिक

Nashik three cubs spotted| मादी बिबट्यासह तीन बछड्यांचा मुक्तसंचार

लहवितवाडीच्या मळा परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : संरक्षण विभागाच्या लहवित एअरपोर्ट स्टेशनच्या सुरक्षा भिंतीलगत मादी बिबट्यासह तिचे तीन बछडे मुक्तपणे संचार करत असल्याने वाडीचा माळ व लहवित परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लहवित गावाजवळील वाडीचा मळा परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसशेती असून, लगतच दारणा नदीचा किनारा आहे. ऊसशेती आणि नदीकाठामुळे या भागात बिबट्यांचा सातत्याने वावर आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना रात्रीच शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. वीज कधी जाते, कधी येते याचा नेम नसल्याने अंधारातच कामे करावी लागत आहेत. मंगळवारी (दि. १७) रात्री साउथ एअर फोर्सच्या संरक्षण भिंतीवर बिबट्याची मादी दिसली.

तसेच भिंतीलगतच्या रस्त्यावर तिचे तीन बछडे फिरतानाही आढळल्याने वाहनधारकांनी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सावध केले. हा रस्ता नाशिक इगतपुरी-दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता असून, दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरे लावावेत, अशी मागणी अरविंद मुठाळ, शंकर मुठाळ यांनी केली आहे.

सोलर बसविण्यासाठी ग्रामपंचायतीने जागा लोडशेडिंग कमी झालेले नाही. वीज नसल्याने बिबट्यांचा होणारा मुक्तसंचार हा येथील नागरिकांसाठी धोका बनत आहे. उपलब्ध करून दिली.

- अॅड. संदीप गायकवाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT