नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदा जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून, ग्रामीण व दुर्गम भागात पाण्याचे संकट गंभीर रूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा परिषदेने कंबर कसली असून, टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दुष्काळाची भीषणता लक्षात घेउन जिल्ह्यातील तब्बल ७०० ते ८०० गाव आणि खेड्यांमध्ये टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा लागू शकतो.
डिसेंबरअखेर ४०० ते एप्रिल-इगतपुरी या भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती अत्यंत बिकट बनत आहे. वाढत्या उन्हामुळे स्थानिक विहिरी आणि कूपनलिकांची (बोअरवेल) पाण्याची पातळी कमालीची घसरली असून, अनेक गावामधील जलस्रोतक पूर्णपणे कोरडे पडले आहेत. जलस्रोतक्षित सुरक्षित करून त्यातून पाणीपुरवठा हा नागरिकांना केला जाईल.
मालेगाव, मनमाड, नांदगाव, पेठ सुरगाणा आणि इगतपुरी या भागांतील गाव खेड्यांवर सर्वाधिक जास्त पाणीपुरवठा केला जाणार आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती आणि पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, असा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. जिल्हा परिषदेच्या टंचाई आराखड्यानुसार, नागरिकांना वेळेवर व पुरेशा पाणी मिळावे, यासाठी खाजगी व सरकारी टँकरची व्यवस्था केली आहे.
सद्यस्थितीत १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. डिसेंबरअखेर हा आकडा ४०० वर पोहोचू शकतो. तर, मार्च-एप्रिलअखेर टँकरचा आकडा ९०० वर पोहोचण्याची शक्यता आहे. यातील जिल्ह्यात सुमारे ७०० ते ८०० गावे आणि पाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.
अखेर टँकरची संख्या ९०० वर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. साधारण १३ कोटींचा हा आराखडा तयार करण्यात आला आहे. जि. प. प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालानुसार मालेगाव, मनमाड, नांदगाव, पेठ, सुरगाणा, येवला आणि इगतपुरी या भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.
वाढत्या उन्हामुळे स्थानिक विहिरी आणि कूपनलिकांची (बोअरवेल) पाण्याची पातळी कमालीची घसरली असून, अनेक गावामधील जलस्रोतक पूर्णपणे कोरडे पडले आहेत. जलस्रोतक सुरक्षित करून त्यातून पाणीपुरवठा हा नागरिकांना केला जाईल. मालेगाव, मनमाड, नांदगाव, पेठ सुरगाणा आणि इगतपुरी या भागांतील गाव खेड्यांवर सर्वाधिक जास्त पाणीपुरवठा केला जाणार आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती आणि पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, असा प्राथमिक अहवाल तयार केला आहे.
जिल्हा परिषदेच्या टंचाई आराखड्यानुसार, नागरिकांना वेळेवर व पुरेशा पाणी मिळावे, यासाठी खाजगी व सरकारी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. टँकर भरण्यासाठी आसपासच्या विहिरी आणि खाजगी जलस्रोत अधिग्रहित करून राखीव ठेवण्यात येत आहेत. गावांमध्ये पाण्याचे असमान वाटप रोखण्यासाठी आणि टँकरच्या फेऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पंचायत समिती आणि तालुकापातळीवर विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोबत पशुधानासाठी चारा आणि पाण्याचे नियोजन करण्याबाबतही वरिष्ठ पातळीवर बैठका घेऊन निर्णय घेतले जात आहेत.
"यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट आहे. मात्र, प्रत्येकाला पाणी पुरवण्यासाठी टंचाई आराखडा तयार केला आहे. पाणीटंचाईचे संकट गंभीर असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, तसेच पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या गावांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे, तिथे ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार तातडीने टँकर मंजुरीची प्रक्रिया राबवली जाईल."— ओमकार पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.)